
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैभवराज रौंदल यांच्या आदेशान्वये अर्जुन मेदनकर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष – धार्मिक प्रकोष्ठ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेतर्फे प्रमाणित करण्यात येते की, अर्जुन मेदनकर हे यापुढे पुणे जिल्ह्यात धर्म रक्षा, गो रक्षा व देशहिताची कार्ये अधिक जोमाने पुढे नेतील. त्यांच्या या नियुक्तीमुळे हिंदू महासभेच्या विचारांचा प्रचार व प्रसार पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गावापर्यंत पोहोचेल, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल अर्जुन मेदनकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

















