
उद्धव ठाकरेंकडून पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
विधानसभा प्रमुखांसह शहर समन्वयक, प्रवक्ता आणि उपशहरप्रमुखांची नियुक्ती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
नियुक्तीनुसार भोसरी विधानसभा प्रमुखपदी अनिल पाराजी सोमवंशी, तर पिंपरी विधानसभा प्रमुखपदी तुषार अंतराव नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भोसरी विधानसभा संघटकपदी अमोल तुकाराम भालेकर, तर चिंचवड विधानसभा संघटकपदी सिद्धिक इस्माईल शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा समन्वयकपदी श्रीमंत गिरी, तर पिंपरी-चिंचवड शहर समन्वयकपदी कैलास पंढरीनाथ नेवासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड प्रवक्तेपदी रावसाहेब चंद्रकांत थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय पिंपरी-चिंचवड शहर उपशहरप्रमुखपदी दिलीप ज्ञानदेव सावंत, दिलीप रामचंद्र दंडवते, नितीन गुलाबराव घोलप, गणेश विजय आहेर, पार्थ रमेश गुरव, किरण ज्ञानेश्वर दळवी, पांडुरंग दिनकर पाटील, लक्ष्मण वामनराव तपकीर, विकास अण्णासाहेब एकशिंगे, गणेश श्रीमंत पाडुळे, सतीश जगदीश मरळ, सुमित रमेश निकाळजे, रावसाहेब माणिक डोंगरे आणि नितीन बोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक रचना अधिक स्पष्ट झाली असून, आगामी काळात शहरातील पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर राहणार आहे.

















