
परिसरातील शिव मंदिरात धार्मिक उपक्रम शिवमय उत्साहात
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीक्षेत्र आळंदीतील माउली मंदिरातील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असताना केवळ एकादशी निमित्त पुढे करून आळंदी देवस्थानने परस्पर अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. या मुळे अनेक भाविकांना श्रावणातील सोमवारी केला जाणारा अभिषेक सेवे पासून वंचित रहावे लागल्याने अनेक भाविकांच्या सेवा खंडित झाल्याचे उद्योजक सचिनशेठ येळवंडे यांनी सांगितले.
या प्रकाराने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त करीत देवस्थानचे कारभारावर ताशेरे ओढले. मात्र आळंदी परिसरातील अनेक शिव मंदिरात भाविकांनी गर्दी करून अभिषेक, पूजा करून दर्शन घेतले.
पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिरात आळंदी देवस्थान तर्फे अभिषेक झाली. परिसरातील शिवभक्तांनी श्रावणी सोमवार आज अजा एकादशी दिनी उपवास करीत एकादशी ही साजरी केली.
आळंदी सह परिसरातील पुरातन, पांडव कालीन शिवमंदिरातही भाविकांनी परिसरात श्रींचे दर्शनास गर्दी झाली होती. भाविकांनी रांगा लावत श्रींचे दर्शन आणि महाप्रसाद घेतला. आळंदीतील इंद्रायणी नदी काठावरील श्री वैतागेश्वर महाराज मंदिरात लहानग्यासह दर्शन घेत स्थानमहात्म्य जोपासत भाविकांनी दर्शन घेतले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रावणातील शेवटच्या सोमवारी श्रींना अभिषेख पूजा करण्यात आली. आळंदी परिसरातील विविध गावांत मंदिर व्यवस्थापकांनी श्रीचे अभिषेकास मंदिरात केले. मंदिर परिसरात चहुबाजूने दर्शनास भाविकांची गर्दी होती. शिवभक्तांना श्री सिद्धेश्वर महाराज पुरातन मंदिरात श्रीचे दर्शन आणि अभिषेख या वर्षी मंदिर बंद असल्याने करता आले नाहीत.
आळंदी पंचक्रोशीतील शिव मंदिरांत भाविकांची गर्दी श्रीचे दर्शनासह अभिषेखास होती. यात येथील इंद्रायणी नदी काठावरील श्री वैतागेश्वर मंदिर,पांडव कालीन वडगाव येथील श्री बेली महादेव मंदिर आदी मंदिरांचा समावेश होता.
आळंदीत सिद्धेश्वर मंदिरात अभिषेखास बंदीने भाविकांत नाराजी
ऐन श्रावण मधील सोमवारी श्री सिद्धेश्वर मंदिरातील अभिषेक बंद ठेवण्यात आले. यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. केवळ एकादशी असल्याचे कारण पुढे करून देवस्थानने नियोजन जमत नसल्याचे उघड केले. भाविकांची गर्दी असते म्हणून नियोजन करायचेच नाही का असा सवाल भाविकांनी व्यक्त करीत उद्योजक सचिनशेठ येळवंडे यांनी नाराजी व्यक्त करीत अभिषेक सेवेत खंड पडल्याने देवस्थान काय जबाबदारी घेणार असा सवाल केला. अजा एकादशी दिनी कार्तिकी, आषाढी यात्रा पेक्षा गर्दी जास्त नसते. फार गर्दी नसताना ही प्रभावी नियोजन न केल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त करीत टीका केली. दर्शन अभिषेक व्यवस्थेन नियोजन न करता धार्मिक उपक्रम बंद करून भाविकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी देवस्थान विश्वस्तांनी जाहीर माफी मागावी अशी मागावी भाविकांनी केली.
इतर मंदिरांत आवाहन करून भाविकांना अभिषेक करण्यासाठी संधी दिली जाते.आळंदीत मात्र अभिषेक बंद ठेवून भाविकांची गैरसोय करून धार्मिक सेवेत खंड निर्माण केला. आळंदी परिसरातील भाविक आणि काही ग्रामस्थाचे नित्य १२ ही महिन्याचे दर सोमवारचे अभिषेक असतात आज देवस्थानच्या या चुकीच्या निर्णय मुळे त्याच्या नित्य अभिषेक सेवेत धार्मिक उपचार मध्ये खंड पडला याला जबाबदार कोण ? त्याच्या भावना दुखावल्या यांचे देवस्थान ट्रस्टीना काही वाटते का नाही असा संतप्त सवाल उद्योजक सचिनशेठ येळवंडे यांनी व्यक्त करीत भाविक, नागरिकांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आळंदीत मात्र अभिषेक बंद ठेवून भाविकांची गैरसोय करण्यात आली. मंदिरांत सहज, सुलभ, सुखकर आणि समाधानकारक दर्शन पण सध्या मिळत नाही. दर्शन बारी मोकळी असताना येरझाऱ्या दर्शन बारीतून माराव्या लागतात. थेट कमी वेळेत दर्शन होणे आवश्यक असताना नियोजन कडे दुर्लक्ष केले जात आहे. आळंदी
ग्रामस्थांना ठराविक वेळेत स्वतंत्र दरवाजा तून दर्शन व्यवस्था नियोजन करण्याची मागणी उद्योजक सचिनशेठ येळवंडे यांनी ग्रामस्थांचे वतीने केली आहे.श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन देखील बंद ठेवण्यात आले होते. भाविकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर दुपार नंतर दर्शन सुरू करण्यात आले. मात्र अभिषेक दिवसभर बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करून पुढे दाद मागणार असल्याचे सांगितले.
अजा एकादशी निमित्त मंदिरात परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रम, उपवासाचा महानैवेद्य झाला. श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. प्रथा परंपरांचे पालन करीत मंदिरात एकादशी साजरी करण्यात आली. इंद्रायणी नदी घाटावर देवस्थान तर्फे इंद्रायणी आरती इव्हेंट उत्साहात झाला. आळंदी नगरपरिषद तर्फे इंद्रायजी नदी घाटावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.














