
– ज्येष्ठ नागरिक हा समाजाच्या अनुभवाचा व संस्कारांचा ठेवा – अनंत कोऱ्हाळे
– रमामंगल सोशल फाउंडेशनचे सामाजिक कार्य सुरूच राहणार – संतोष सौंदणकर
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै. सौ. मंगलताई रमाकांत सौंदणकर यांच्या स्मरणार्थ आणि नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडगावातील रस्टन कॉलनी व एसकेएफ कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा कट्टा तसेच वाचनालयाचे लोकार्पण बुधवारी (दि. 2) सायंकाळी करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रस्टन कॉलनी व एसकेएफ कॉलनी परिसरात ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची निर्मिती करण्यात आली. तसेच, नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांना वाचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी वाचनालय देखील उभारण्यात आले. या कामासाठी नगरसेवक निधीचा उपयोग करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शिवसेना जिल्हा संघटक तथा रमामंगल सोशल फाऊंडेशनचे सर्वेसर्वा संतोष सौंदणकर म्हणाले, कै. मंगलताई रमाकांत सौंदणकर यांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा नियमित प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या विरंगुळ्यासह त्यांना संवाद साधण्यासाठी एक चांगली जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा कट्टा व वाचनालय सुरू कले. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य केले. भविष्यातही रमामंगल सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.
नगरसेवक अनंत कोऱ्हाळे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजाचा अनुभवाचा आणि संस्कारांचा मोठा ठेवा आहे. त्यांना एकत्र येण्यासाठी आणि वेळ सकारात्मक पद्धतीने व्यतीत करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. रस्टन कॉलनी व एसकेएफ कॉलनीतील नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन नगरसेवक निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालयाची उभारणी करण्यात आली. या सुविधांचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
या वेळी परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी रमामंगल फाउंडेशन चे सचिव संतोष मोरजकर, कार्याध्यक्ष सुमित कांबळे, उपाध्यक्ष गणेश ओगले, जेष्ठ सल्लागार समितीचे सुभाष मालुसरे, मेजर अशोक शेलार, कैलास भंडारी, नंदकुमार घोडेगावकर, हरीभाऊ क्षीरसागर,आनंद ढगे, गुलाब मुलाणी, मोहन वायकुळे, अशोक मोदगेकर, अनिल कदम, किशोर साटलकर, वैभव जनशब्दी, कांतिलाल लालवाणी, श्री साटम, श्री अनंदा वाघोले, श्री अप्पा कुलकर्णी, फिरोज खान, राजू गुजराती, गणेश गाडे, ओमप्रसाद परदेशी, आश्विन मायनाळे, विकास मारणे, विक्रम तांबे, महेश शर्मा, स्वप्नील गाडे, उमेश परदेशी आदि उपस्थीत होते आदी उपस्थित होते.

















