
नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा उरो रुग्णालय औंध छावणी येथील महर्षी वाल्मिकी मंदिरा मध्ये भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव नुकताच संपन्न झाला.
महर्षी वाल्मिकी पंचायत व मंदिर ट्रस्ट यांच्याकडून आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात येथील पंचक्रोशीतील नागरिक या जन्म उत्सवासाठी येतात.भगवान वीर गोगादेव जन्मोत्सवा निमित्त भगवान वीर गोगादेव यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून विधीवत पूजा व आरती चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकर जगताप,नगरसेवक माऊली जगताप,नगरसेविका पल्लवी जगताप,नगरसेवक धनराज बिर्दा,डॉ.देवीदास शेलार,सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे,महर्षी वाल्मिकी पंचायतचे अध्यक्ष राजबाबू सरकनिया,धनंजय जाधव,किशोर लालबेगी,सागर चंडाले, विजय बेद,सत्यवान ग्यानी,सुनील चटोले,राजेंद्र खेराले,सुनील चव्हाण,जगदीश कागडा,रोहित वाघेला,सोहन सरकनिया,स्वप्नील चंडाले,अक्षय खत्री,जयेश चव्हाण,हरी परदेशी, मनीष सरकनिया इत्यादि पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव राजू बेद यांनी केले तर अध्यक्ष राजबाबू सरकनिया यांनी आभार व्यक्त केले.
इतिहास व शौर्य : गोगाजींचा जन्म राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील ददरेवा येथे राजा झेवर आणि राणी बाच्छल यांच्या पोटी झाला.त्यांनी गाय रक्षणासाठी आणि परकीय आक्रांतांविरुद्ध (महमूद गजनवी) निकराचा लढा दिला.युद्धात त्यांचे शीश धडापासून वेगळे झाल्यानंतरही त्यांनी शौर्याने लढा दिला होता.त्यांना ‘जहरपीर’ (साक्षात् देवता) ‘गोगापीर’ आणि ‘वीर गोगादेव’ म्हणून नावाने ओळखले जाते.पूजा आणि गोगाजींना सर्पदंश (सापने चावणे) पासून रक्षण करणारा देव भाविकांकडून मानले जाते.त्यांच्या दर्शनासाठी आणि रक्षणासाठी भक्त श्रावण महिन्यात विशेष उत्सव व जत्रा साजरी करतात.

















