
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाढदिवसाचा उत्सव केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जपणूक करण्याचा आदर्श कोकण जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व चिखली साने चौक वृत्तपत्र एजन्सीचे प्रोप्रायटर मिलिंद दाभोळकर यांनी घालून दिला.
दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी ५१व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीत जाऊन २६वे रक्तदान केले. वाढदिवशी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
या उपक्रमाला प्रोत्साहन देत सामाजिक कार्यकर्ते पोपट आरणे यांनीही दाभोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वायसीएम रुग्णालयात रक्तदान केले.
यावेळी वायसीएम रक्तपेढीच्या डॉ. नीता घाडगे, तंत्रज्ञ प्रियंका खानविलकर, सुधीर माळी, दत्तराज सागरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, राजेंद्र साळवी, सत्यम साळवी, अवधूत कदम यांच्यासह मित्रपरिवाराने मिलिंद दाभोळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले.
“वाढदिवसाला स्वतःसाठी काही घेण्यापेक्षा एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करणे, हाच खरा आनंद आणि माणुसकीचा उत्सव आहे,” असा संदेश त्यांच्या या उपक्रमातून समाजासमोर आला आहे.

















