रहाटणी परिसरातील प्रलंबित असलेले ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामास सुरुवात, शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज शत्रुघ्न काटे यांच्या सतत पाठपुराव्याने रहाटणी परिसरातील गणराज कॉलनी याठिकाणी दीर्घकाळ प्रलंबित असलेले ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे गणराज कॉलनी याठिकाणी ड्रेनेज विषयीचा प्रश्न नागरिकांना भेडसावत होते.सतत ड्रेनेज लाईन तुंबत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते आणि यामुळे होणाऱ्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
शत्रुघ्न काटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित पालिका ड्रेनेज विभागाला याबाबत माहिती दिली आणि वाढती नागरीवस्ती पाहता उपलब्ध ड्रेनेज पाईपलाईन वर अतिरिक्त ताण पडत असल्यामुळे आणि भविष्यातील वाढ लक्षात घेता अस्तित्वात असलेली जुनी ड्रेनेज लाईन बदली करून त्याठिकाणी नवीन ३००mm व्यासाची पाईपलाईन टाकण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुख यांना दिले होते.
शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या सूचनांची दखल घेत पालिकेमार्फत गणराज कॉलनी याठिकाणी नवीन ३०० mm व्यासाची नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्राथमिकतेने आमचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल गणराज कॉलनी मधील रहिवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.