
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी येथे ‘2nd IEEE International Conference on Electronics, Computing, Communication and Networking Automation Technologies 2026’ (IEEE ICEC2NT 2026) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद 3 आणि 4 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून, परिषदेत इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानातील आधुनिक संशोधन, नव्या संकल्पना आणि तांत्रिक प्रगतीवर चर्चा होणार आहे.
परिषदेतील ‘Track I: Communication’ हा विभाग विशेषत्वाने कम्युनिकेशन तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर केंद्रित असून, तो IEEE EDS Society यांच्या सह-प्रायोजकत्वाखाली आणि IEEE Pune Section यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन Team IEEE ICEC2NT 2026 करणार आहे. महाविद्यालयातील Electronics & Telecommunications Engineering, Instrumentation and Control Engineering आणि Information Technology या विभागांचा आयोजनात सहभाग आहे.
संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी ही परिषद संशोधनविषयक विचारांची देवाणघेवाण, नवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संवादासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

















