
महिला आयोगाच्या अध्यक्षांची तातडीने नियुक्ती करा — दुर्गा भोर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रक्षाबंधनानिमित्त दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली.
रक्षाबंधनानिमित्त दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली.
महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या ७ महिन्यांपासून रिक्त आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि संशयास्पद मृत्यूंच्या घटना समोर येत असताना महिला आयोगाला सक्षम आणि पूर्णवेळ नेतृत्व मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे दुर्गा ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमारी दुर्गा भोर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांना ‘लाडकी बहीण’ म्हणून सन्मान दिला आहे. मात्र, आर्थिक मदतीसोबतच प्रत्येक लाडक्या बहिणीला सुरक्षिततेची ठोस हमी मिळाली पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोणताही राजकीय विलंब न करता तातडीने करावी आणि आयोगाची संपूर्ण यंत्रणा सक्रिय करावी,” अशी मागणी दुर्गा भोर यांनी केली. तसंच शक्ती कायदा अमलात आणावा
यावेळी वाकड येथील शिल्पा गवारे यांच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. माहेरच्या मालमत्तेतील हिस्सा आणि पैशांसाठी त्यांचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष आणि सखोल तपास करून दोषी आढळणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
“राखी ही केवळ नात्याची नव्हे, तर बहिणीच्या संरक्षणाच्या वचनाची प्रतीक आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत केवळ घोषणा नकोत; ठोस निर्णय आणि तातडीची कारवाई हवी,” असे दुर्गा भोर यांनी स्पष्ट केले.
यावेळी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमारी दुर्गा भोर, युवती अध्यक्षा कुमारी अवंतिका भोर, युवती गार्गी डोके ,
कुमारी दिपाली चव्हाण युवती उपाध्यक्ष, युवती संघटक कुमारी पायल मानकर, कुमारी वैष्णवी देवकते, कुमारी नेहा शिंगोटे, जयश्री साळुंखे, रईसा पठाण, रूपा सोनार आणि कु. मोहसीना शेख यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

















