ताज्या घडामोडीपिंपरी

“घर चलो अभियान” अभियानाला पिंपरी चिंचवड शहरवासियांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी ४ फेब्रुवारीपासून शहरात “घर चलो अभियान” राबविण्यात येत असून, या अभियानाला पिंपरी चिंचवड शहरवासियांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात हे यशस्वी आभियान सुरु आहे.

या अभियानांतर्गत भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव व महावितरण समिती सदस्य यांनी त्यांच्याकडील सोपविलेले पिंपळे निलख, विशाल नगर आदी भागातील बूथ क्रमांक 438,439,440,441,442, बूथ वरील नागरिकांशी संवाद साधला.दोन दिवस विशाल नगर पिंपळे निलख या भागातील 300 पेक्षा जास्त घरांमध्ये पदाधिकारी ,कार्यकर्त्यासह जावून मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली.सकाळी ९ वाजता वारियर्स संकेत चोंधे व बूथ प्रमुख- अमित सुतार यांच्या घरी चहा – नाष्टा करून अभियानाला सूरूवात झाली. या भागातील 300 पेक्षा जास्त घरांमध्ये जावून नागरिकांसोबत संवाद साधून मोदी सरकारचा दहा वर्षातील विकास, विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देवून २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारत आणि महासत्ता करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान बनविण्याच्या दृष्टीने आवाहन करण्यात आले.
या अभियानात प्रवासी कार्यकर्ता म्हणून भाजपा शहर सचिव व महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी जबाबदारी पार पाडली.

नगरसेविका आरती चोंधे,माजी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे,अल्का मकवाना, विक्रांत गोगावले,धनश्री चिटणीस,अमित सुतार,शोभा कांबळे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button