दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे पिंपरी चिंचवड शहरात विद्यार्थी आणि महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आंदोलन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे पिंपरी चिंचवड शहरात विद्यार्थी आणि महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन घेण्यात आली. यावेळी राज्यात दोन गृह खाती करावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनात बहुसंख्येने दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या बहुसंख्या महिला भगिनी तरुण तरुणी आणि नागरिक ही उपस्थित होत्या.
यावेळी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष कु दुर्गा भोर यांनी तीव्र शब्दात शासनाविरोधात निषेध नोंदवला तसेच जसे उपमुख्यमंत्री राज्याचे दोन होऊ शकतात तसे गृहखाते दोन करण्याची मागणी करण्यात आली अनेकदा महिला भगिनी आणि अनेक नागरिक पोलीस स्टेशनमध्ये आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी जात असतात परंतु अनेक अधिकारी वर्गावर अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी रोजच कोणत्या ना कोणत्या भागामध्ये असते त्यामुळे सदर तक्रारी तपास करण्यासाठी पोलीस विभागाला खूप वेळ लागतो आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते अनेकदा तक्रार करायला गेल्यानंतर देखील अनेक पोलीस अधिकारी ठाण्यामध्ये उपस्थित नसून ते फक्त अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी जास्त वेळ त्यांचा खर्च होतो त्यामुळे राज्यातील अनेक समस्या या बरेच वर्ष बरेच दिवस पडून आहेत तसेच अनेक शालेय संस्था आणि महाविद्यालय येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे देखील पोलीस वेरिफिकेशन होणे गरजेचे आहे शाळा कॉलेज जवळील भागामध्ये असणारे बस स्टॉप हे शाळेच्या समोर असणे गरजेचे अनेक शाळांच्या जवळ बस स्टॉप नसल्यामुळे विद्यार्थिनींना चालत बस स्टॉप पर्यंत जावे लागते आणि मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्यावर विनयभंगासारखे प्रसंग निर्माण होतात जेणेकरून टवाळकी मुलं त्याचा गैरफायदा घेणार नाही आणि मुली सुरक्षित घरी पोहोचतील, शासनाने घरोघरी जाऊन सर्वे केला पाहिजे.
किती महिला सुरक्षित आहे किती असुरक्षित आहेत त्या सर्व मधून बऱ्याचशा महिलांच्या समस्या या समोर येतील, एमआयडीसी परिसर आणि अनेक दुकानांमध्ये ज्या महिला काम करतात त्यांच्यावर लेबर कॉन्ट्रॅक्टर कडून अनेक वेळा अशा प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे परंतु दबावाखाली या महिला कामगार पुढे येण्यास कचरतात कारण त्याचा न्याय मिळण्याची अपेक्षा नसते अनेकदा या महिलांचे पीएफ तसेच त्यांच्या मूलभूत गरजांपासून त्यांना दूर ठेवले जाते दुर्गा ब्रिगेड संघटने तर्फे विद्यार्थिनींसाठी महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक कुठलीही अडचण असल्यास ७७५८९८८८४८ देण्यात आलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून अनेक शालेय विद्यार्थिनी एमआयडीसीतील महिला कामगार नागरिक वस्तीतील गृहिणी यांच्यावर अनेक प्रकारे बलात्कार विनयभंग छेडछाड दबावतंत्र असे प्रकार केले जात आहे तसेच अनेक शाळा व महाविद्यालय शिक्षक कर्मचारी यांनीही पोलीस पडताळणी झाली पाहिजे तसेच. प्रत्येक महाविद्यालयांचा उपहारगृह येथे सीसीटीव्ही कॅमेरा लावणे बंधनकारक करावे आंदोलनाच्या वेळेस मोठ्या संख्येने युवती असतील महिला असतील यांनी आपले विचार मांडले तसेच क्रिएटिव्ह अकॅडमी मध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल देखील निषेध करण्यात आला आणि शिक्षण व्यवस्थेला देखील चौकशी व्हावी याची मागणी करण्यात आली.
यावेळी दुर्गा भोर,विद्या पाटील, स्वाती मुरकर, शैलजा चौधरी , चंदा वानखेडे साधना दातिर, पद्मा कांबळे, वैभवी शिंदे,ईशानी सुतार ,माया खंडागळे, अनिता बलाढ्य,कल्पना बागुल , साक्षी तेली, अंजली सिंग, तनुजा बटवाल, अवंतिका गवस इत्यादी मोठ्या संख्येने महिला भगिनी तसेच अभय भोर ,कल्पेश मुरकर, अथर्व पकाले,रमेश सकपाळ, महेश ठोंबरे व अनेक तरुण देखील सहभागी झाले होते.