Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»स्वामी श्री गोविंददेवगिरीजी यांचे अमृत महोत्सव श्री श्री रविशंकरजी यांची आळंदी मंदिरास भेट
ताज्या घडामोडी

स्वामी श्री गोविंददेवगिरीजी यांचे अमृत महोत्सव श्री श्री रविशंकरजी यांची आळंदी मंदिरास भेट

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com8 February 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

आर्ट ऑफ लिविंगचे प्रमुख श्री श्री रवी शंकरजी यांचा सन्मान

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आचार्य स्वामी श्री गोविंददेवगिरीजी यांचे अमृत महोत्सवा निमित्त गीता भक्ती अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या आयोजित नारी शक्ती कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास आर्ट ऑफ लिविंग चे प्रमुख श्री श्री रवी शंकरजी अमृत महोत्सवात आचार्य स्वामी श्री गोविंददेवगिरीजी यांना सद्दिच्छा देण्यासह उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त अँड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे यांचे हस्ते श्री श्री रवी शंकरजी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी यांचे समवेत त्यांनी संवाद साधला. यावेळी देहू देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी गीता भक्ती अमृत महोत्सव सभागृहात श्री श्री रविशंकरजी यांचा सन्मान करण्यात आला. श्रीश्री रविशंकर यांनी येथे मार्गदर्शन केले. माऊली मंदिरात हे विश्वाची माझे घर ! श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचे यांचे तत्वावर येथे काम करण्यास कार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वेळी देशभरातील गुणवंत नावलौकिक प्राप्त महिला यांनी जे देशात विविध ठिकाणी आपल्या कुटुंबियां वेळप्रसंगी विचार न करता अगदी कोरोना काळातही मोठे समाज कार्य, अध्यामिक कार्य, गीता प्रचार प्रसाराचे कार्य केले. अशा ७५ महिलांचा व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात मंगलमय वातावरणात करण्यात आला.
गीताभक्ती अमृत महोत्सवात नारी सन्मान सोहळा उत्साहातआळंदी येथे प पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ११ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गीता परिवार यांच्या वतीने आळंदी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी संजय मालपाणी म्हणाले, या ठिकाणी प पू स्वामी गोविंदगिरी महाराज यांचा ७५ वा जन्मोत्सव गीता भक्ती महोत्सव या नावाने सुरू आहे. अत्यंत प्रगल्भतेने जीवनभर कार्य करणाऱ्या ७५ सेवावर्तींचा सन्मान, ७५ वैदिकांचा सन्मान, ७५ संतांचा सन्मान, ७५ देशभक्तांचा सन्मान असे वेगवेगळे सन्मान आळंदीतील कार्यक्रमात होत आहेत. यातील आज बुधवारी स्त्री शक्तीचा दिवस साजरा केला जात आहे. महिला आपल्या कडे आशा आहेत, ज्या कायमच पडद्या मागे राहतात,आणि काम करत असतात.गीता परिवार ही एक अशी संस्था आहे ,ज्यामध्ये ९५ टक्के महिला काम करतात.

कोरोनाच्या वर्षा मध्ये आशु गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वामीजींच्या आशीर्वादाने प्रेरणेने कार्य केले. घर बसल्या भागवत गीता शिक्षणाचे आयोजन केले. भागवत गीता कश्यासाठी शिकायची तर अर्जुनाला तणाव होता, तसं आपले ही होते .नैराशाने ,भयाने आपण ग्रस्त होतो. भागवत गीता या सर्वातून बाहेर काढते. स्वामींजींच्या द्वारे स्थापन झालेल्या गीता परिवाराच्या माध्यमातून हे ३८ वर्ष कार्य सुरूच आहे.

ऑनलाइन कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यात वाढ झाली.१८६ देशांमधले ८ लाख लोक भागवत गीता शिकत आहे. यामध्ये १३ वेगवेगळ्या भाषांमध्ये शिकवले जात आहे.पहाटे ५ वाजता बॅच सुरू होते व रात्री २ वाजता अमेरिकेतील लोकांसाठी बॅच होते.यादरम्यान २२०० झूम क्लासेस रोज होतात.त्या माध्यमातून गीतेचा प्रचार प्रसार सुरू झाले. यामध्ये ८ लाख कार्यकर्ते आहे. त्यात बहुतांश महिला कार्यकर्त्या आहेत. आज मुख्यत्वे महिलांचा सन्मान केला जात आहे.

हा जो कार्यक्रम चाललेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्म प्रतिष्ठापना व्हावी.धर्माचा जो अर्थ आहे कर्तव्य आहे ,या दृष्टिकोनातून आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भगवत गीतेचे प्राचरण करून रूपांतर केले आणि ज्ञानेश्वरी लिहिली. या गीतेचा प्रचार प्रसार संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने सुरू आहे. या पवित्र भूमीमध्ये इंद्रायणीच्या तीरावर माऊलींच्या समाधी जवळ यांना बोलवावं त्यांचा सन्मान व्हावा. यादृष्टीकोनातून गीता महोत्सवाचे आयोजन आहे.

अनेक देशातील लोक हा आळंदीतील गीता महोत्सव पाहत आहे. येथील जी कीर्तन परंपरा आहे , पहिल्यांदा पाहायला भेटली. आपल्या येथे कीर्तनाची श्रेष्ठ परंपरा आहे. ही परंपरा समजली पाहिजे. वारकरी शिक्षण संस्थेतील लहान मोठे येथे किर्तन करतात. येथे हरिपाठ होत आहेत. कीर्तनाचा आनंद ते घेत आहेत. मराठी भाषा समजली नाही तरी टाळ मृदुंगाच्या नादात रममाण होत आहेत. अनेक जण मला म्हणाले त्या नादाने आमच्या मनाला स्पर्श केला.

गीता परिवाराचे आशू गोयल म्हणाले, या महोत्सवात पडद्यामागून ज्या व्यक्ती कार्य करत आहे त्यांचा सन्मान येथे करणार आहोत. देशात महत्व पूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान येथे होत आहे.आज मातृशक्तीच्या दिवशी त्या मातेंचा सन्मान येथे झाला. अश्या १३ प्रगल्भतेने काम करणाऱ्या माता शक्तींना येथे आमंत्रित केले आहे. ज्या मातृशक्ती चा सन्मान होणार आहे. त्याबाबत त्यांनीं यावेळी माहिती दिली.
गिरीधारी काळे म्हणाले, वेदशास्त्र संवाद हा असा विषय आहे जो गीता महोत्सवात महत्वाचा घेतला आहे. स्वामिनींच्या निर्देशना नुसार ३ गोष्टींचे वेदांचे कार्य करताना त्यांना साध्य करायच्या होत्या.
त्यात पहिले होते शब्दाचे रक्षण, वेद मुखोद्गत राहिले नसल्याने त्याचे रक्षण होत नव्हते. त्याकरिता पाठशाळा काढल्या गेल्या. आता पर्यंत दोन अडीच हजार विद्वान समाजाला समर्पित केले.

दुसरे अर्थ रक्षण, म्हणजे त्याचे अर्थ कळायला हवे. तिसरा आहे तो सिध्दांत, वैदिक पद्धतीने जीवन जगायचे कसे ? या तीन उद्देशावर त्यांचे कार्य होते.आता वेद रक्षण झाल्यानंतर त्याचा अर्थ सजवून घेणे.त्याच्याबद्दल चर्चा करणे.तसेच त्यांनी वेद, वेदमंत्र,ग्रहण त्याची उच्चार पध्दती, त्याचे महत्त्व याविषयी यावेळी काळे यांनी माहिती दिली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सभासदांची  वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी
Next Article गीता भक्ती अमृत महोत्सवात महिला सक्षमीकरणाला मिळाला नवीन दृष्टीकोन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.