महापौरपदासाठी रवी लांडगे, उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे; शुक्रवारी विशेष सभेत निर्णय

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून रवी लांडगे आणि उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या दोघांचे नाव निश्चित केले आहे. आज (सोमवारी) दोघेही उमेदवारी अर्ज दाखल केला करणार आहेत. भाजपची एकहाती सत्ता असल्याने दोन्ही उमेदवारांची निवड निश्चित मानली जात असून शुक्रवारी (६ फेब्रुवारी) अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपचे ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. महापाैर पदाचे आरक्षण खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी ( २ फेब्रुवारी) दुपारी तीन ते पाच ही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
भाजपने प्रभाग सहा धावडेवस्ती-भगतवस्तीमधून सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे यांनी महापौर आणि प्रभाग १९ – आनंदनगर, गावडे पार्क प्रभागाचे प्रतिनिधीत्व करित असलेल्या शीतल शिंदे यांनी उपमहापौरपदाची उमेदवारी निश्चित केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या दोघांचे नाव निश्चित केले आहे. त्यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. त्यानुसार दोन्ही उमेदवारांकडून लवकरच महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले



















