ताज्या घडामोडी

देश, राज्य आणि पिंपरी-चिंचवडच्या आर्थिक विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प –  संतोष सौदणकर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारने सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प देश, राज्य तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या आर्थिक विकासाला गती देणारा असल्याचे मत शिवसेना पिंपरी-चिंचवड जिल्हा संघटक  संतोष सौदणकर यांनी व्यक्त केले आहे.

या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती तसेच मध्यमवर्गीय व कामगार घटकांसाठी दिलेल्या तरतुदी महत्त्वपूर्ण असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. विशेषतः शहरांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत रस्ते, वाहतूक, आरोग्य व नागरी सुविधा अधिक सक्षम होतील, असे त्यांनी नमूद केले.
उद्योग, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या तरतुदींमुळे आर्थिक चक्र अधिक गतिमान होईल. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि दुर्बल घटकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांमुळे सर्वसमावेशक विकास साध्य होईल, असा विश्वास मा. सौदणकर यांनी व्यक्त केला.

हा अर्थसंकल्प ‘विकास, विश्वास आणि भविष्य’ यांचा समतोल साधणारा असून देशाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button