Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
ताज्या घडामोडी

‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 January 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा अंतिम आणि निर्णायक टप्पा उद्या, शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातून पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या (UCI) निकषांनुसार व्यापक व काटेकोर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

स्पर्धेतील प्रमुख टप्पा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथून दुपारी १.३० वाजता सुरू होणार असून पुणे शहरातील विविध मार्गांवरून जात हा टप्पा जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. या अंतिम टप्प्याचे एकूण अंतर ९९.१५ किलोमीटर आहे.

ही स्पर्धा राजीव गांधी ब्रिज (औंध), काळेवाडी फाटा, बास्केट ब्रिज (रावेत), डी. वाय. पाटील कॉलेज (आकुर्डी), भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक, इंद्रायणी नगर चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर, स्पाईन रोड, जुना आरटीओ रोड, आयुक्त बंगला, एम्पायर इस्टेट ब्रिज अशा महत्त्वाच्या मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. या माध्यमातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भाग एकाच आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय निकषांनुसार शहराची तयारी
स्पर्धेच्या अनुषंगाने महापालिकेमार्फत रस्त्यांचे डांबरीकरण, पदपथ दुरुस्ती, गतिरोधक हटविणे, चेंबर्स समपातळीवर आणणे, बीआरटी रेलिंगची दुरुस्ती व रंगरंगोटी, पुलांचे सुशोभीकरण, थर्मोप्लास्टिक पेंटिंग, चौकांचे सौंदर्यीकरण, विद्युत व्यवस्था सुधारणा तसेच संपूर्ण मार्गाची विशेष साफसफाई करण्यात आली आहे.

यासोबतच मार्गावरील बेवारस वाहने हटविणे, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची आखणी, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय व आपत्कालीन सेवा यांचेही सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. काही कालावधीसाठी आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भित्तिचित्रांतून क्रीडा आणि संस्कृतीचा संगम
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी क्रीडा, सायकलिंग, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि विविध खेळांतील दिग्गजांचे दर्शन घडवणारी आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या सौंदर्यीकरण उपक्रमामुळे शहरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अंतिम टप्प्यात देश-विदेशातील नामवंत सायकलपटूंचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमंत्रालयातील सोडतीनंतर पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण ठरणार?
Next Article ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात सुवर्णपाळण्यात गणेश जन्म सोहळा संपन्न
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.