Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘बजाज पुणे ग्रँड टूर’चे शहरात जल्लोषात स्वागत आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा: महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौक ते आकुर्डी, रावेत रस्त्यावर नागरिकांची दुतर्फा गर्दी
ताज्या घडामोडी

‘बजाज पुणे ग्रँड टूर’चे शहरात जल्लोषात स्वागत आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा: महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौक ते आकुर्डी, रावेत रस्त्यावर नागरिकांची दुतर्फा गर्दी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com21 January 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

ढोल-ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाची लाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवडकरांनी ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे जल्लोषात स्वागत केले. वेग, शिस्त आणि खेळभावनेचा संगम असलेली ही स्पर्धा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होताच लक्ष्मी चौक ते आकुर्डी या मार्गावर ही स्पर्धा पाहण्यासाठी

नागरिकांची हजारोंच्या संख्येने दुतर्फा गर्दी जमली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेने या स्पर्धेच्या अनुषंगाने जय्यत तयारी करीत शहरातील प्रमुख मार्गांसह तसेच चौकांमध्ये ठिकठिकाणी फुलांची आकर्षक सजावट केली होती.

‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला आज प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू झालेल्या या टप्प्याचा समारोप डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी, रावेत येथे झाला. . याठिकाणी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील विजेत्यांचा सन्मान खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, राजाराम सरगर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार यांच्यासह महापालिका तसेच विविध उद्योग समूहांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते.

‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण अंतर ९१.८ किलोमीटर होते. या टप्प्याची सुरुवात टी.सी.एस.सर्कल, हिंजवडी येथून झाली. स्पर्धा सुरू असतानाच रस्त्यांवर सायकलपटू वेग आणि क्षमतेचा सुरेख मिलाफ सादर करताना दिसले. काही ठिकाणी तीव्र वळणे, चढ-उतार असल्याने स्पर्धकांसमोर आव्हाने होती. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू आत्मविश्वासाने ही आव्हाने पेलताना दिसून आले.. मार्गावरील ठरावीक ठिकाणी वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, तांत्रिक मदत वाहने तसेच रिफ्रेशमेंट पॉइंट्स सज्ज ठेवण्यात आले होते. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोटरसायकल पथकांच्या माध्यमातून सातत्याने स्पर्धा परिसराचे निरीक्षण करण्यात येत होते.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौक येथे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंचे आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हे सायकलपटू लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट येथे पोहोचले. यावेळी लक्ष्मी चौक ते आकुर्डी या मार्गावर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. स्पर्धेच्या समारोपस्थळी सायकलपटूंचे पिंपरी चिंचवडकरांनी जल्लोषात स्वागत केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. विशेष करून यावेळी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सूक्ष्म नियोजन..
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली होती. स्पर्धा मार्गाची पाहणी करून वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा तसेच आपत्कालीन सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. काही कालावधीसाठी मार्गांवर वाहतूक वळविण्यात येऊन आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बंद ठेवण्यात आले होते.

याशिवाय स्पर्धा मार्गावर चौकाचौकांत उद्यान विभागाच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा
पिंपरी चिंचवड शहरात ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेच्या निमित्ताने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये खेळाप्रती उत्साह निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने    ठिकठिकाणी आकर्षक भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत शहराच्या सौंदर्यीकरणाचा हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. या भित्तिचित्रांमध्ये केवळ सायकलिंगच नव्हे, तर विविध खेळांतील दिग्गज खेळाडूंचा गौरव करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा आणि संस्कृतीचे दर्शनही या भिंतींवर घडत होते. या कलेच्या माध्यमातून   ठिकठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये क्रीडा उत्सवासाठी योग्य वातावरणनिर्मिती झाली आहे.

हे आहेत स्पर्धेतील विजेते
प्रथम – मॉडगवे लोके (Modgway Loke)
द्वितीय – सँटी आर्ने (Santy Arne)
तृतीय – जॉर्जिओस (Georgios )
बेस्ट इंडियन रायडर – हशवीर सिंग (Hashveer Singh)
बेस्ट यंग रायडर – स्पिएरो तामार (Spiero TaMar)
बेस्ट एशियन रायडर – साइनबायर (Saainbayarr)
किंग ऑफ माऊंटन – रायलेआनू क्रिस्टियन (Raileanu Cristian)

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपीसीसीओईआरचा ‘एसएई इंडिया ई-बाहा २०२६’ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; ११ पदके आणि ३ लाख ६० हजार रुपये बक्षीस
Next Article तळवडे, कळस परिसरातील वीज पुरवठा सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’ भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.