Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»कर संकलन विभागाची दमदार कामगिरी सुरूच
ताज्या घडामोडी

कर संकलन विभागाची दमदार कामगिरी सुरूच

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com30 January 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाची दमदार कामगिरी सुरूच असून दहा महिन्यात तब्बल सातशे काेटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. उर्वरित दोन महिन्यात जास्तीत-जास्त कर वसूल करण्यासाठी विभागाने आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जिथे सील करता येणे शक्य नाही त्या ठिकाणी जप्त’ करण्याचा प्रथमच मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी मालमत्ता जप्त हाेऊ नये, यासाठी त्वरित कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख 15 हजार मालमत्ता आहेत. यापैकी तब्बल 4 लाख 21 हजार मालमत्ता धारकांनी 716 कोटी 40 लाख रूपयांचा भरणा करून शहर विकासात योगदान दिले आहे. त्याबद्दल पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी या जबाबदार आणि जागरूक करदात्यांचे मनस्वी आभार मानले आहेत.

जनजागृती, वारंवार आवाहन, जप्ती पूर्व नाेटीस, माेबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही कर न भरणा-या मालमत्ता धारकांबाबत कठाेर पाऊले उचलण्यास कर संकलन विभागाने सुरूवात केली आहे.

शहरात थकबाकीदारांमध्ये रहिवाशी मालमत्तांची संख्या माेठी आहे. अशा मालमत्ता धारकांना पाच वेळा भेटी देऊन कर भरण्याबाबत सूचना केल्या, मालमत्ता जप्त हाेण्याचा इशारा दिला. त्यानंतरही थकबाकीदार नागरिक कर भरण्यास प्रतिसाद देत नाहीत. वास्तविक मानवतेच्या दृष्टीकाेनातून रहिवाशी सदनिका महापालिका सील करत नाहीत. मात्र, आता यापुढे अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मात्र ही जप्ती मालमत्ता सिल न करता किंवा कुठलीही जंगम मालमत्ता जप्त न करता केली जाणार आहे. त्यासाठी सदर मालमत्तेवर जप्ती अधिपत्र डकवले जात आहे. रहिवास करत असलेले थकबाकीदार आर्थिक क्षमता असूनही कुठल्याही पाठपुराव्याला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रहिवाशी मालमत्तांकडे जवळपास 300 कोटीच्या वर थकबाकी आहे. यापूर्वी बंद असलेल्या रहिवाशी सदनिका बंद असल्याने सील केल्या होत्या. गत वर्षी त्यांची संख्या 70 च्यावर होती. यावर्षी अशा जप्त केलेल्या मालमत्तांची संख्या 100 च्यावर गेली आहे आणि ही कारवाई 31 मार्चपर्यंत चालू राहणार आहे.

283 मालमत्ता जप्त; 98 मालमत्तांना अधिपत्र डकविले

वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या 17 झोनमधील तब्बल 283 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यापैकी 98 निवासी मालमत्तांना अधिपत्र डकविले आहे. यानंतरही थकीत कर न भरल्यास संबंधित मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचा इशारा कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

शहरात सध्या मालमत्ता कर नोंदणी अभियान सुरू आहे. त्यामध्ये साडे चार लाखापेक्षा जास्त मालमत्तांचे geo -sequencing करण्यात आले आहे. जवळपास 1 लाख मालमत्तांची अंतर्गत मोजणी आणि आवश्यक माहिती संकलित करण्यात आलेली आहे. महापालिका वेगवेगळे पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या सोसायट्या, महिला, दिव्यांग, माजी सैनिक यांना अनेक सवलती देत असते. या सवलती देण्यासाठी “पालिका आपल्या दारी” असे हे अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी स्वतःहून आपला तपशील पालिकेच्या भेट पथकाला पुरवावा जेणेकरून त्यांना कुठलाही अर्ज न करता, कार्यालयात हेलपाटे न मारता घर बसल्या या सवलती मिळणार आहेत. तेंव्हा हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व गृहनिर्माण सोसायट्या, मालमत्ताधारक यांनी सहकार्य करावे. तसेच थकबाकीदार यांनी आपला थकीत कर भरून जप्तीसारखी कटू कारवाई टाळावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी 12% कर उत्पन्न वाढ नोंदवणे 15व्या वित्त आयोगाच्या अनुदानासाठी आवश्यक आहे.

:- शेखर सिंह, आयुक्त

नियमित मासिक बैठका घेऊन माझ्याकडून कर संकलन विभागाचा आढावा घेतला जातो. मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली यांचे एकात्मिकरण करण्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी एकाच वेळी भरणे शक्य होणार आहे. याचा नागरिकांना लाभ होईल. विभागाला आवश्यक असणारे एम एस एफ जवान, जप्ती वाहने आणि प्लंबर तातडीने उपलब्ध करून. देण्यात आलेले आहेत. बांधकाम परवानगी विभाग आणि कर संकलन विभाग यांचे एकात्मिकरण अंतिम टप्प्यात आलेले आहे. जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया वेगवान करण्यासाठी गवर्नमेंट व्हॅल्यूअर यांचे पॅनल नेमण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया वेगवान होईल.

:- प्रदीप जांभळे पाटील

अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

कोट:- 3

माननीय आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसार वसुली मोहीम ही अधिकाधिक तीव्र करण्यात येत आहे. सध्या कर संकलन मुख्य कार्यालयाकडून गुगल मिटच्या माध्यमातून रोजच्या रोज आढावा घेतला जातो आहे. मालमत्ता कर नोंदणी अभियान सुद्धा सध्या वेगाने चालू आहे. येत्या वर्षभरात सर्व मालमत्ता धारकांना सर्व सवलती, सुविधा घर बसल्या मिळतील अशा पद्धतीने माहिती संकलित करण्यात येत आहे. नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक वसुली करून नवा विक्रम नोंदवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

:- नीलेश देशमुख,सहायक आयुक्त

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था कासारवाडी (मुलींची) येथे डिजीटल स्मार्ट रूम व इतर बाबींसाठी स्थायी समिती सभेची मान्यता
Next Article भारताला क्रीडा महासत्ता करण्याचे ध्येय – पांडूरंग चाटे 
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.