Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; 15 जानेवारीला मतदान 128 नगरसेवकांसाठी रणधुमाळी; आचारसंहिता लागू, 12 दिवसांचा प्रचार कालावधी
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; 15 जानेवारीला मतदान 128 नगरसेवकांसाठी रणधुमाळी; आचारसंहिता लागू, 12 दिवसांचा प्रचार कालावधी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com16 December 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – होणार होणार असे, केवळ बोलले जात होते; मात्र अखेर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 ला मतदान होत आहे. तब्बल 9 वर्षांनंतर महाापालिकेची निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांसह इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. असे असले तरी, पालिका सभागृहात पूर्वीप्रमाणेच 128 नगरसेवक असणार आहेत. त्यात वाढ झालेली नाही. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सोमवार (दि. 15) जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. प्रचारास 3 ते 14 जानेवारी असा केवळ 12 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

महापालिकेची मागील निवडणूक फेब्रुवारी 2017 ला झाली होती. त्यानंतर तब्बल 9 वर्षानंतर यंदा निवडणूक होत आहे. कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण, न्यायालयाचा निकाल आदी कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. या सर्व कारणांमुळे चार वर्षांचा कालावधी नगरसेवकांविना गेला. या काळात आयुक्तांनी प्रशासक म्हणून पालिकेचा कारभार पाहिला आहे. अनेक मोठ्या व खर्चिक कामांना प्रशासकीय राजवटीत मान्यता देण्यात आली. अखेर, सोमवार (दि. 15) पालिका निवडणुका घोषित झाल्या आहेत. नऊ वर्षानंतर निवडणुका होत आहेत; मात्र नगरसेवकांच्या जागा पूर्वीप्रमाणेच 128 आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे चार सदस्यीय एकूण 32 प्रभाग आहेत.

राजकीय फ्लेक्स, किऑक्स, झेंडे तात्काळ हटवा

निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत. राजकीय पक्ष तसेच, इच्छुकांचे होर्डिंग, फ्लेक्स, किऑक्स, पोस्टर तसेच, पक्षाचे झेंडे व फलक तात्काळ हटविण्यात यावेत, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तसेच, निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आठ निवडणूक निर्णय अधिकारी

फेब्रुवारी 2017 ला महापालिका निवडणुकीसाठी अकरा निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले होते. यंदा अकराऐवजी आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये असणार आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्याही केल्या आहेत.

1) प्राधिकरण निगडी येथील हेडगेवार भवन येथे प्रभाग क्रमांक 10, 14, 15 आणि 19 साठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.

2) प्रभाग क्रमांक 16, 17, 18 आणि 22 करिता ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, एल्प्रो मॉलच्या मागे, चिंचवडगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.

3) प्रभाग क्रमांक 2, 6, 8 आणि 9 करिता क क्षेत्रीय कार्यालय, हॉकी पॉलिग्रास हॉकी स्टेडियमजवळ, नेहरूनगर येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.

4) प्रभाग क्रमांक 25, 26, 28 आणि 29 करिता ड क्षेत्रीय कार्यालय, बीआरटी रस्ता, रहाटणी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.

5) प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आणि 7 करिता कबड्डी प्रशिक्षण संकुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे, भोसरी येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.

6) प्रभाग क्रमांक 1, 11, 12 आणि 13 करिता चिखली येथील घरकुल प्रकल्पाशेजारील टाउन हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.

7) प्रभाग क्रमांक 21, 23, 24 आणि 27 साठी ग क्षेत्रीय कार्यालय, वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मागे, थेरगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.

8) प्रभाग क्रमांक 20, 30, 31 आणि 32 करिता सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील बॅडमिंटन हॉल येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे- 23 ते 30 डिसेंबर 2025

उमेदवारी अर्जाची छाननी- 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची मुदत-2 जानेवारी 2026

चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे- 3 जानेवारी 2026

मतदानाचा दिवस-15 जानेवारी 2026

मतमोजणी-16 जानेवारी 2026

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘एक संधी वंचितला’ निर्धार सभेत बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; मतदान, घरकुल, SRA, देशाची दिशा यावर परखड भूमिका
Next Article त्रिवेणीनगर- तळवडे प्रभाग क्र.१२ मध्ये भाजपाची आक्रमक भूमिका ठरली ‘गेम चेंजर’; स्थलांतरित झालेली नावे पुन्हा प्रभागात समाविष्ट
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार  पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी…

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.