Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘एक संधी वंचितला’ निर्धार सभेत बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; मतदान, घरकुल, SRA, देशाची दिशा यावर परखड भूमिका
ताज्या घडामोडी

‘एक संधी वंचितला’ निर्धार सभेत बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; मतदान, घरकुल, SRA, देशाची दिशा यावर परखड भूमिका

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com13 December 2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– शहरात आयोजित ‘एक संधी वंचितला’ या भव्य निर्धार सभेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी व्यवस्थेवर जोरदार टीका करत नागरिकांना संविधानिक हक्कांसाठी जागृत राहण्याचे आवाहन केले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत त्यांनी मतदान प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन, SRA योजना, देशाची राजकीय दिशा आणि संविधानाच्या रक्षणावर परखड भूमिका मांडली.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, ज्याला मतदानाचा अधिकारच वापरता आला नाही, त्याचे मतदान चोरी झाले असे म्हणता येईल. पण मतदानाचा हक्क बजावूनही मत चोरी झाल्याची ओरड केली जाते, ही दिशाभूल आहे. प्रत्यक्षात बूथवर बसलेले अधिकारीच १०० ते १५० मते सत्ताधारी पक्षाला टाकतात. ही मतांची चोरी नाही, तर अधिकची मते सत्ताधाऱ्यांना देण्याची पद्धतशीर प्रक्रिया राबवली जात आहे. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) मागील मैदानावर झालेल्या एक संधी वंचितला सभेत बोलत होते. यावेळी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना ११३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.सुरुवातीला गायक मेघानंद जाधव यांच्या भीमगीताचा कार्यक्रम झाला.तसेच समता सैनिक दलाकडून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली.

आंबेडकर पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात असून, शहरात सुमारे २० हजार मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.आता झोपडपट्टी धारकाला संधी आली आहे. जो झोपडपट्टी धारक निवडणुकीला उभा राहणार असेल, त्याला वंचित बहुजन आघाडीचे तिकीट दिल्याशिवाय राहणार नाही. आपले घर आपणच बांधायचे ठरवले पाहिजे आणि झोपडपट्टी धारकांचा प्रतिनिधी सभागृहात पाठवला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.घरकुल आणि SRA योजनांवर बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. जोपर्यंत कायमस्वरूपी घर मिळत नाही, तोपर्यंत किमान १५ हजार रुपये घरभाडे मिळाले पाहिजे. खासगी बिल्डर ज्या ठिकाणी SRA योजना राबवेल, तेथे १५ हजार रुपये भाडे देणार असल्याचे लेखी देत नाही, तोपर्यंत त्याला कोणतीही परवानगी मिळू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

देशाच्या परराष्ट्र आणि अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पंतप्रधान मोदी चीन आपला मित्र असल्याचे सांगतात, तर लष्करप्रमुख चीन आपला शत्रू असल्याचे स्पष्ट करतात. विश्वास कोणावर ठेवायचा? मी लष्करप्रमुखांवर विश्वास ठेवतो. गेल्या पंधरा वर्षांपासून धर्माच्या नावावर राजकारण सुरू असल्याने आज भारतासोबत एकही खरा मित्र उरलेला नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

प्रबुद्ध भारत टीमकडून विशेष मालिकेची घोषणा
या सभेत प्रबुद्ध भारत टीमच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या संसदेतील १०० पेक्षा अधिक ऐतिहासिक, दिशादर्शक आणि मुद्देसूद भाषणांवर आधारित विशेष मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचा प्रभावी टिझर सभास्थळी प्रदर्शित करण्यात आला. टिझरला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लवकरच प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून ही मालिका प्रसारित होणार असून, बहुजन समाजाच्या प्रश्नांवर संसदेत मांडलेले बाळासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

यावेळी बोलताना राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव म्हणाले की,जेव्हा जेव्हा संकट येते, अन्याय आणि अत्याचार होतो, तेव्हा फक्त बाळासाहेब आंबेडकर लढण्यासाठी पुढे येतात. संविधानाचा सन्मान आणि रक्षण करण्याचे काम केवळ वंचित बहुजन आघाडी करत आहे. वंचित, शोषित समाजाला संविधानिक विचारांच्या आधारे न्याय मिळवून देणारे आणि संधी देणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत.

फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर बोलणारे अनेक आहेत; पण त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. SRA कार्यालयावर मोर्चा काढून जनतेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व मागण्या मान्य करून घेणारे नेतृत्व त्यांनीच दिले आहे असे मत राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी व्यक्त केले.

शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत सांगितले की,भाजपाने सत्तेत आल्यापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कंगाल केले आहे. आज देशात खरी विरोधी पक्षाची भूमिका फक्त वंचित बहुजन आघाडी बजावत आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि स्थानिक विकासासाठी नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेने वंचितला एक संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

सभेत ॲड. अरविंद तायडे, अनित चव्हाण, विनोद गायकवाड, आस्मा शेख, संतोष लोखंडे यांनीही आपली मते मांडली. या भव्य निर्धार सभेला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

एक संधी वंचितला ही सभा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नवा संदेश देणारी ठरली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली दिशा, धोरण आणि लढ्याची तयारी स्पष्टपणे जनतेसमोर मांडली आहे.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रभाग क्रमांक ३ मधून मनीषा सिद्धार्थ तापकीर निवडणूक रिंगणात; परंपरा, कार्यकर्तृत्व आणि शाश्वत विकासाचा ठाम अजेंडा
Next Article पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; 15 जानेवारीला मतदान 128 नगरसेवकांसाठी रणधुमाळी; आचारसंहिता लागू, 12 दिवसांचा प्रचार कालावधी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.