त्रिरत्न बौद्ध महासंघाचा ‘सामाजिक कार्य’ पुरस्कार माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांना प्रदान

पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – त्रिभुवन यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची त्रिरत्न बौद्ध महासंघाने रहाटणी प्रभागाचे मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची विशेष दखल घेत त्यांचा ‘सामाजिक कार्य’ पुरस्काराने गौरव केला.
हा पुरस्कार वितरण सोहळा काळेवाडी येथील बुद्धानुस्मृती विहाराच्या मैदानात पार पडला. यावेळी त्रिरत्न बौद्ध महासंघाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजातील शेकडो महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या अध्यक्षा धम्मचारिणी शीलवती यांनी सांगितले की, “बाबासाहेब त्रिभुवन हे सामाजिक न्याय आणि बौद्ध तत्त्वांचे खरे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याने समाजातील वंचित घटकांना प्रेरणा मिळते. हा पुरस्कार त्यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अथक परिश्रमाचा सन्मान आहे.”
सन्मानाला उत्तर देताना त्रिभुवन म्हणाले की, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून, संपूर्ण भीम अनुयायी आणि समाजातील सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे. या पुरस्कारामुळे मला प्रेरणा मिळाली असून भविष्यातही सामाजिक कार्याचा हा वसा मी अधिक जोमाने पुढे चालवेन.”
यावेळी महासंघाचे पदाधिकारी, मा. स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, पंचनाथ सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ मंजाळ, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नरेंद्र माने, तिरंगा क्रीडा मित्र मंडळ अध्यक्ष गोविंद वलेकर, पवना हेल्थ क्लब अध्यक्ष संजय पगारे, स्वप्न संकुल सोसायटी अध्यक्ष अविनाश मेश्राम, रॉयल मेंडूस सोसायटी अध्यक्ष राहुल भातकुले, सनशाइन नगर सोसायटीचे सेक्रेटरी नितीन काळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शेकडो महिला-नागरिक उपस्थित होते.













