ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सेवा पंधरवडा’ निमित्त पंतप्रधान मोदींच्या जीवन चरित्रावरील माहितीपट व प्रदर्शनी व्हॅनचे उद्घाटन

Spread the love

*कृपया प्रसिद्धीसाठी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित माहितीपट आणि विशेष प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले. सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी पिंपरी येथील भाजप शहर मध्यवर्ती कार्यालयात या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे व माजी आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांच्या हस्ते अत्याधुनिक एलईडी व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, माजी प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, संतोष कलाटे, माऊली थोरात, वरिष्ठ उपाध्यक्ष काळूराम बारणे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, शहर प्रवक्ते कुणाल लांडगे, अभियान संयोजक तुषार हिंगे, विनायक गायकवाड, संजय पटणी, राम वाकडकर, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, हर्षल नढे, सोमनाथ तापकीर, जयदीप खापरे, अजित बुर्डे, रामदास कुटे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, सुरेश भोईर, संदीप वाघेरे, राजू दुर्गे, रवींद्र देशपांडे, विठ्ठल भोईर, बिभीषन चौधरी, कैलास सानप, अभिजीत बोरसे, युवराज लांडे, गोरक्षनाथ झोळ, दत्ता झुळूक, सतीश नागरगोजे, सचिन राऊत, नंदू कदम, आल्हाट ताई, नीता कुशारे, प्रीतिंसिंह परदेशी, सीमा चव्हाण यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींच्या जीवन चरित्रावर आधारित माहितीपट दाखवण्यात आला, ज्यामध्ये त्यांच्या बालपणातील संघर्षापासून ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा प्रवास उलगडण्यात आला. उपस्थितांनी या माहितीपटाचे कौतुक केले. यासोबतच, मोदींच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती दर्शवणारी आकर्षक ‘प्रदर्शनी’ देखील सर्वांसाठी खुली करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणाने देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यांचे जीवन हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. ही एलईडी व्हॅन आणि प्रदर्शनी पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेला मोदींच्या कार्याची माहिती देईल.”
हे अभियान यशस्वी करण्यासाठी संयोजक तुषार हिंगे, विनायक गायकवाड आणि संजय पटणी यांनी विशेष मेहनत घेतली. ही एलईडी व्हॅन पुढील पंधरा दिवस शहराच्या विविध भागात फिरणार असून, जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मोदींच्या जीवन आणि कार्याचा संदेश पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button