ताज्या घडामोडीपिंपरी

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लाल रंगाचा संदेश ; उन्नती सोशल फाउंडेशन आणि लायन्स क्लबच्या संयुक्त रक्तदान शिबिरातून जीवनदानाला बळकटी

Spread the love

 

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव २०२५ च्या दुसऱ्या दिवशी, मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन लाल रंगाच्या औचित्याने केले गेले. एकूण ६८ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. लाल रंग उत्साह, सामर्थ्य आणि जीवनाचा संदेश देतो ही या उपक्रमामागील संकल्पना होती.

रक्तदान हा सर्वोच्च दान असल्याचे आवाहन करत, या शिबिरामार्फत सामाजिक बांधिलकी आणि मानवतेसाठी योगदान देण्याची संधी उपस्थित नागरिकांना मिळाली. शिबिर सकाळी ९:३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय, पिंपळे सौदागर येथे चालले.

उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री संजय तात्याबा भिसे यांनी या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, “रक्तदान हा समाजातील प्रत्येक नागरिकासाठी जीवनदानाचा प्रतिक असून, कोणत्याही परिस्थितीत आपण या मानवसेवेच्या उपक्रमात सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नवरात्र उत्सवाच्या लाल रंगाच्या औचित्याने हा शिबिर आयोजित करणे हे सामाजिक बांधिलकीस प्रोत्साहन देणारे ठरले आहे. नागरिकांनी रक्तदानाद्वारे फक्त जीवन वाचवले नाही, तर समाजातील एकजूट, सहकार्य आणि मानवतेच्या मूल्यांची जाणीवही निर्माण केली. आजच्या उपक्रमातून आपल्याला हे स्पष्ट झाले की, प्रत्येक छोटासा सामाजिक प्रयत्न मोठा बदल घडवू शकतो. मला आनंद आहे की युवा आणि वरिष्ठ नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.”

याप्रसंगी , श्री जग्गनाथ काटे, संस्थापक, पी. के. स्कूल; श्री राजेंद्र जसवाल, अध्यक्ष लायन बालाजी जगताप, सचिव लायन डॉ. ज्योती क्षीरसागर, खजिनदार लायन जितेंद्र हिंगणे, तसेच लायन गुलशन नामकुडे, लायन भरत अंकुशे, लायन योगेश नाईक, लायन शोभा उदम, लायन ऋषिकेश देवरे, लायन धनंजय माने, लायन अंकुश इंगळे, लायन आशोक कुमार, लायन भाग्यलक्ष्मी कटारी, लायन प्रकाश कापरे, डॉ. मकरंद शहापुरकर व टीम यांच्यासह आनंद हास्य क्लबचे सदस्य, विठाई वाचनालयाचे सभासद , ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनचे सर्व सभासद. तसेच, लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागरच्या टीम मधील सदस्य आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button