Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षकांचा गौरव
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षकांचा गौरव

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com6 September 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून २३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा पैलू आहे. महापालिकेचा शिक्षण विभाग आणि शाळा अतिशय उत्तम कार्य करीत आहेत. मी देखील महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असून माझ्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा आहे, असेही ते म्हणाले.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, शाळा म्हणजे मुलांच्या भविष्यासाठीचा भक्कम पाया आहे. त्या पायाला मजबूत करण्याचं कार्य आपले शिक्षक निष्ठा, समर्पण आणि प्रेमाने करीत आहेत. पर्यवेक्षक आणि शिक्षक यांचा एकत्रित प्रयत्न हीच आपल्या महापालिका शाळांची खरी ताकद आहे. शिक्षकांच्या या योगदानामुळे महापालिका अधिक गुणवत्तापूर्ण, सक्षम आणि आदर्शवत शाळा उभारण्याच्या दिशेने सातत्याने प्रगती करत आहे.

सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले की, महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देत नाहीत, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे महत्त्वाचे कार्यही करतात. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आपल्या महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत आहे. शिक्षण विभाग सातत्याने गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्नशील असून, या प्रवासात शिक्षकांचा सहभाग आणि त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी केले. सूत्रसंचालन चारोशीला फुगे यांनी केले, तर आभार गणेश लिंगडे यांनी मानले.

…….
*आयुक्तांनी व्हिडिओ संदेशाद्वारे दिल्या शुभेच्छा*

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचा यावेळी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देणारा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला. यामध्ये आयुक्त सिंह यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे की, शिक्षक म्हणजे फक्त ज्ञान देणारे नाहीत, तर मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे खरे शिल्पकार आहेत. प्रत्येक मुलाच्या यशामागे त्याच्या शिक्षकाची निष्ठा, कष्ट आणि ममत्व दडलेलं असतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांनी गेल्या काही वर्षांत केलेली प्रगती ही शिक्षक आणि पालक यांच्या मेहनतीमुळेच शक्य झाली आहे. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं केंद्र नव्हे, तर भावी पिढी घडविण्याचं मंदिर आहे. आपल्या शाळा पालकांना अभिमानाने निवडाव्याशा वाटाव्यात हा आपला ध्यास असून, त्या दिशेने शिक्षकांचा वाटा सर्वांत मोठा आहे.’

आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले शिक्षक

शिक्षक दिनानिमित्त विशेष कामगिरीबद्दल महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा समावेश होता. यामध्ये क्रीडा शिक्षक भाऊसाहेब व्यंकट खैरे, पीसीएमसी पब्लिक स्कूल जाधववाडी कन्या प्राथमिकचे जितेंद्र कराड आणि आबासाहेब पाळवंदे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.

तर, थेरगाव येथील बालवाडी विभागातील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेच्या सविता मांडेकर, यशवंतराव चव्हाण उर्दू शाळा थेरगावच्या नसरीन बानो मोहम्मद सुलतान आणि सावित्रीबाई फुले शाळा मोशीच्या वैशाली साकोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.

प्राथमिक शाळांमधून मोशी मुले येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या प्रियंका गावडे, सुभांगी भोंडवे, दिघी कन्या पब्लिक स्कूलचे प्रदीप घुटे, भोसरी कन्या पब्लिक स्कूलच्या स्वाती शिंदे, मोशी कन्या पब्लिक स्कूलच्या कांचन घोडे, चिखली कन्या पब्लिक स्कूलच्या विश्वलता मोरे, कुदळवाडी पब्लिक स्कूलचे मारुती खामकर, पिंपळे गुरव पब्लिक स्कूलच्या चित्रा शेवकरी आणि थेरगाव उर्दू पब्लिक स्कूलच्या उस्ताद बिबिहाज्रा जंगबहादूर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

माध्यमिक शाळांमधून पिंपळे गुरव येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या प्रिया नांगरे, पिंपळे सौदागर येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या वैशाली मामुल्वार, राजश्री कांबळे आणि क्षितिज शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खासगी शाळांमधून निगडी येथील विलू पूनावाला प्राथमिक शाळेच्या मनिषा कदम आणि श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिंचवडच्या अंजू सोनावणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.

तसेच, पिंपरी चिंचवड महापालिका संचालित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल व ज्युनियर कॉलेजचे सखाराम पितळे आणि काळेवाडी येथील आकांक्षा संचालित कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळेच्या मेघा कानडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड दौरा ऐनवेळी रद्द, कार्यकर्त्यांचा हिरमोड
Next Article गणेश विसर्जनासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.