चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
समिधा गझल मंचचे शनिवारी गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते उद्घाटन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समिधा गझल मंच, पुणे या संस्थेच्या उद्घाटनानिमित्त शनिवार, दिनांक २८ जून) सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे सायंकाळी ठीक पाच वाजता गझलसागर प्रतिष्ठान प्रस्तुत गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या ‘गझलसंवाद’ या खास मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गझलकार प्रा. सतीश देवपूरकर आणि म. भा. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या या मैफलीचे सूत्रसंचालन डाॅ. अविनाश सांगोलेकर करणार आहेत.
नि:शुल्क असलेल्या मैफलीत गझललेखन आणि गझलगायनाचे तंत्र – मंत्र तसेच विविध रंजक किस्से आणि गप्पांचा आनंद श्रोत्यांना घेता येईल. अधिक माहितीसाठी समिधा गझल मंचाचे संस्थापक – अध्यक्ष डाॅ. प्रशांत पाटोळे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ८४५९८१४२७९ वर संपर्क साधावा.












