ताज्या घडामोडीपिंपरी
नेवाळे वस्तीतील अपूर्ण स्ट्रोम वॉटर लाईनमुळे नागरिक त्रस्त; शाळकरी मुलांचेही जीवन धोक्यात – दिनेश यादव यांची महापालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणी

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नेवाळे वस्ती येथील Birds International School कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेले स्ट्रोम वॉटर लाईनचे काम एप्रिल २०२५ पासून रखडले आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येकडे लक्ष वेधत दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनाद्वारे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याची संपूर्ण खोदाई झालेली असून, पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. लहान मुलांना शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.या ठिकाणी तातडीने पुढील उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे:
कामाचे वेळापत्रक जाहीर करून लवकरात लवकर पूर्ण करावे,संबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस द्यावी,तात्पुरती सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी,
अपघात टाळण्यासाठी प्रकाशव्यवस्था, चेतावणी फलक आणि बॅरिकेड्स लावावेत.
माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे.













