ताज्या घडामोडीपुणे

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाची सायकल वारी उत्साहात!

सलग चौथ्या वर्षी एकाच दिवसात पार केले लोणी-काळभोर ते पंढरपूर अंतर

Spread the love

 


पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्ञानोबा-तुकोबाचा गजर, एकमेकांना माऊली… माऊली या नावाने मारलेली हाक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुलींचा उत्फुर्त प्रतिसाद अशा वातावरणात सलग चौथ्या वर्षी येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे तर्फे सायकल वारी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 

एमआयटी एडीटी विद्यापीठाने सायकल वारीच्या माध्यमातून भक्तिभाव, पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक संदेशाचा संगम साधताना लोणी-काळभोर येथून ३५ सायकलस्वारांच्या चमूसह पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करताना अवघ्या एका दिवसात २२० किमीचे हे अंतर पार केले. सायकल स्वारांच्या या चमूने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाने प्रवास करत विद्यापीठात राष्ट्रीय रोइंग प्रशिक्षक संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी मोठ्या उत्साहात पूर्ण केली.

 
या सायकल वारीला एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या आणि सर्व सहभागी सायकलस्वारांचे अभिनंदन केले.

वारीमध्ये सहभागी सायकलस्वारांनी “नशा मुक्त भारत”, “विश्वशांती” आणि “स्वस्थ जीवनशैली” यांचे संदेश देत, शिस्तबद्धतेसह हेल्मेट, हाय व्हिजिबिलिटी जॅकेट्स, मेडिकल सपोर्ट याची विशेष काळजी घेत ही सायकल वारी सलग चौथ्यांदा निर्विघ्न पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button