चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार अमित गोरखे यांच्या आमदार निधी मधून मोहननगर डॉली अँड समीर कंपनीजवळ 315 KVA चा नवीन ट्रान्सफॉर्मर तसेच सूर्योदय कॉम्प्लेक्स काळभोर नगर येथे 315 KVA च्या सद्यस्थितीतील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून 630 KVA इतकी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते झाले.

अमित गोरखे म्हणाले  आमदार निधी मधून पहिला निधी माझी जन्मभूमी येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी देण्यात आला. त्याचे मी भाग्य समजतो व गणेश लंगोटे तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झाले. व पुढे देखील परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.

मोहननगर व काळभोर नगर मधील नागरिक सतत जाणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त होते ही समस्या लक्षात घेऊन श्री गणेश लंगोटे ( उपाध्यक्ष भा.ज.पा) हे आमदार अमित गोरखे यांच्याकडे गेले व ट्रान्सफॉर्मर ची मागणी केली. व सतत पाठपुरावा केल्यामुळे आज मोहन नगर व काळभोर नगर येथील नागरिकांना नवीन ट्रान्सफॉर्मर आमदार निधी मधून मिळाला त्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदारांचे आभार मानले. प्रास्ताविक गणेश लंगोटे यांनी केले.

सदर कार्यक्रमांमध्ये विधानपरिषद आमदार अमितजी गोरखे , गणेश लंगोटे, कैलास कुटे , धरम वाघमारे , राजू दुर्गे , मनीषा शिंदे , नेताजी शिंदे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button