
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथून विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालय चौकात सायंकाळी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाले. यावेळी शहराच्या वतीने उपमहापौर शर्मिला बाबर यांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
याप्रसंगी नगरसदस्य संदीप वाघेरे, नगरसदस्या प्रियांका कुदळे, निकिता कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्या उषा वाघेरे, गिरिजा कुदळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कनिष्ठ अभियंता बापूसाहेब रोकडे तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















