Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; भाजपतर्फे वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमांची रेलचेल
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; भाजपतर्फे वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमांची रेलचेल

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com6 June 2025Updated:7 June 2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"resize":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग  न्यूज) –  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाने भारले होते. भारतीय जनता पक्षाच्यावतीने शहरभर विविध संस्था, राजकीय पक्ष आणि प्रशासकीय विभागांनी सहभागाने वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले. आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नेते, प्रशासकीय अधिकारी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’तर्फे पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण  (Tree plantation at Pimple Saudagar by ‘Shatrughan Kate Youth Foundation’)
पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’ने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज अधोरेखित केली आणि प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जयनाथ काटे, भरत काटे, प्रवीण कुंजीर, बाळकृष्ण परघळे यांच्यासह ‘ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन’चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘नक्षत्र बाग वृक्षारोपण सोहळा’ पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात संपन्न
वनस्पती आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, पिंपरी-चिंचवड येथे ‘नक्षत्र बाग वृक्षारोपण सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. ‘ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन पुणे’ आणि ‘विप्रा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम गुरुवारी सूर्यमुखी हनुमान मंदिर, ट्रान्सपोर्ट नगर, हनुमान मंदिर निगडी येथे संपन्न झाला.
या सोहळ्याला आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माजी महापौर राहुल जाधव, राजेंद्र बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, अजय पाताडे, तुषार हिंगे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, प्राधिकरण – चिंचवड मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळुक, सुशांत मोहिते, संत ज्ञानेश्वर उद्यान हास्य परिवाराचे अध्यक्ष जगन्नाथ वैद्य, गणेश ढाकणे, नंदू कदम, बाळा शिंदे, प्रमोद भावसार, अनिल गौंड, आळंदी खंडोबा देवस्थानचे तानाजी काळभोर, सोमनाथ काळभोर, राधिका बोरालिकर, विजय शिनकर, देविदास साबळे, देविदास पाटील यांसह अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थिती लावली. मंडल अध्यक्ष जयदीप खापरे यांनी ‘नक्षत्र बाग’ संकल्पनेचे महत्त्व विषद केले. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या देशी रोपांची लागवड करण्यात आली.

रावेतमध्ये ‘माझं झाड, माझी जबाबदारी’ (‘My tree, my responsibility’ in Ravet)  उपक्रमांतर्गत २५० वृक्षारोपणाचा संकल्प
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रावेत येथे ‘हरित रावेत – माझं झाड, माझी जबाबदारी’ या अनोख्या उपक्रमांतर्गत २५० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रावेतमधील युवक, विविध सोसायट्या, पर्यावरण संरक्षण गतीविधी गट आणि शिवछत्रपती मित्र मंडळ (सदगुरू चौक, रावेत) यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पावसाळ्यादरम्यान संपूर्ण रावेत नगरीमध्ये या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्वांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळत असून, पिंपरी चिंचवड उद्योग आघाडीचे सरचिटणीस चैतन्य देशपांडे, तसेच सत्यवान भोंडवे, दीपक तपास, तुषार निकम, शरद भुजबळ, वीरेंद्र सोनवणे, अनुया चव्हाण, ऐश्वर्या भोंडवे, यतीन पत्की, नाना भोंडवे, राजेश देशमुख, मयूर नरखडे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

भाजपा सांगवी-पिंपळे गुरव मंडलातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मंडळाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता आज लावलेले हे रोप भविष्यात एक मोठा वटवृक्ष बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार शंकर जगताप यांनी केले. कार्यक्रमाला नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, भाजपा उपाध्यक्ष जवाहर ढोरे, सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर, भाजपा चिटणीस हिरेन सोनवणे, भाजपा कायदा आघाडी सदस्य परेश नरुटे, अविनाश गायकवाड, प्रदीप झांजुर्णे, सुभाष जाधव, जगदाळे, प्रभाग प्रमुख वैभव ढोरे, निलेश सरोदे, अतुल बडगे, ऋत्विक काची, दीपक घंगाळे, राहुल गवारी, विकी सोनवणे असे सर्वजण उपस्थित होते. भाजपा सांगवी पिंपळे गुरव मंडल अध्यक्ष गणेश ढोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

वाकड परिसरात ‘पिंक सिटी रस्ता’ येथे दुकानदारांच्या सहभागातून वृक्षारोपण  (Tree plantation with the participation of shopkeepers at ‘Pink City Road’ in Wakad area)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाकड परिसरात पिंक सिटी रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात रस्त्याच्या बाजूचे दुकानचालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी नगरसेवक विनायक रमेश गायकवाड, संदीप कस्पटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे वृक्षारोपण पार पडले. वृक्षारोपण करताना, लावण्यात आलेली सर्व झाडे दुकानदारांनी दत्तक घेऊन त्यांचे १० वर्षांपर्यंत संगोपन व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सर्व दुकानचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत या उपक्रमाचे स्वागत केले.

*शहरातील इतर भागांतील पर्यावरण दिन कार्यक्रम*
• *संत तुकाराम नगर:* संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, मंडल अध्यक्ष मंगेश धाडगे, भाजपा सरचिटणीस संजय मंगोडेकर, नंदू आप्पा कदम, कुणाल लांडगे, देवदत्त लांडे, महेंद्र बाविस्कर, सुनील पालांडे, ऍड. युवराज लांडे, सुनील लांडगे, संतोष टोनगे, ऍड. दत्तात्रय झुळूक, गणेश संभेराव, अनघा रुद्र, दीपक भंडारी, संतोष दुबे, प्रज्योतसिंग हंस, अभय फाळके, राजाराम जगताप, सुरेश गदिया, सार्थ पालांडे, प्रणव शेलार, गौरव दास, ज्ञानेश्वर लोहकरे आणि मनपा वृक्ष प्राधिकरण अधिकारी घोडे आदी  उपस्थित होते.

कृष्णा नगर, घरकुल परिसर (प्रभाग ११): प्रभाग क्रमांक ११, कृष्णा नगर, घरकुल परिसरामध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली आणि त्यानंतर स्पाईन रोड शेजारील बुद्ध विहारात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन अजय पाताडे यांनी केले.

इंद्रायणी नगर, नेहरूनगर मंडळ:* धावडे वस्ती, इंद्रायणी नगर, नेहरूनगर मंडळात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. शिवराज लांडगे, कविता भोंगाळे यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

चिंचवडगाव (प्रभाग १८):* जिजाऊ पर्यटन केंद्रात अश्विनी चिंचवडे आणि यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले.

प्रभाग १३:* भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या सूचनेनुसार वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये भाजप पदाधिकारी रामदास कुटे, नगरसेविका कमलताई घोलप, बाबा परब, नगरसेवक उत्तम केंदळे, चंद्रकांत शेडगे, जयश्रीताई मकवाना, सुनील राणे, किशोर मकवाना, उमेश घोडेकर आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

रहाटणी पिंपळे सौदागर मंडलांतर्गत: थेरगाव हॉस्पिटलसमोर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीधर पेटकर, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, नगरसेवक अभिषेक बारणे, तानाजी बारणे, आरोग्य निरीक्षक दरोडे, मेजर रणदिवे आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोमनाथ तापकीर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांनी पर्यावरणाबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली, ज्यामुळे शहरात हरित आणि स्वच्छ पर्यावरणाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticleDr. Dy patil college :तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजचा पुढाकार
Next Article पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षारोपण सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.