स्व बळावर महिलांसाठी समाजपयोगी उपक्रम राबविणाऱ्या अनिता संदीप काटे


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –


आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…”
तुला मानाचा मुजरा
अशाच कणखर अनिता काटे यांनी स्व बळावर महिलांसाठी समाजपयोगी उपक्रम राबवून नागरिकांना मदतीचा हातभार दिला आहे. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यावर त्यांचा भर असतो.

विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी प्रबोधन
पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मध्ये ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी राबविले. त्याच बरोबर क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी सहभाग वाढविण्यासाठी हळदी कुंकू समारंभ, शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगा दिवस, मुलांसाठी शालेय उपक्रम वह्या पुस्तक वाटप करून त्यांनी मोलाची मदत केली. कोरोना काळातही अन्नदान करून त्यांनी गरजूचे अन्नदाते बनले. या सर्व उपक्रमात महिलांचा हिरिरीने सहभाग असतो.
माणुसकीची भिंत उपक्रम स्तुत्य
माणुसकीची भिंत या उपक्रमाद्वारे गोरगरीबाना कपडे वाटप केले. हा उपक्रम वाखान्याजोगा ठरला. अनेक गोरगरीब लोकांना यामुळे मदत झाली.निवडणूक काळात शंकर जगताप यांना पाठिंबा देऊन प्रचारासाठी काटे परिवाराने मेहनत घेतली.










