ताज्या घडामोडीपिंपरी

जागतिक महिला दिन विशेष पिंपरी चिंचवडच्या महिला नेतृत्वाची नवी उमेद – ज्योती सचिन निंबाळकर

Spread the love

जागतिक महिला दिन विशेष

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजकारण आणि राजकारण यांना समान पातळीवर ठेवत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षा ज्योती सचिन निंबाळकर यांनी आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे. विशेषतः महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ

सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी समर्पित असलेल्या ज्योती निंबाळकर यांनी 2018 पासून तुळजाई महिला बचत गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. आपल्या दूरदृष्टी आणि नेतृत्वक्षमतेच्या बळावर त्या आज शहराध्यक्षपदी पोहोचल्या आहेत. महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा देण्याबरोबरच समाजात परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. अथक परिश्रम, ठाम निर्णयक्षमता आणि समाजासाठी निस्वार्थ सेवा या गुणांनी त्यांना एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या कार्याचा ठसा समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

त्यांनी अनेक महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यांचा हा प्रवास केवळ राजकीय यशापुरता मर्यादित न राहता, सामाजिक परिवर्तनाचा महत्वपूर्ण भाग ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपरी चिंचवडमध्ये महिलांसाठी एक नवा आत्मविश्वास आणि उन्नतीची दिशा निर्माण झाली आहे.

महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा वसा
महिला सक्षमीकरण आणि समाजसेवा या दोन महत्त्वाच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमध्ये केवळ महिलांच्याच नव्हे, तर समाजातील विविध घटकांच्या विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांचा समावेश होता.

महिला सक्षमीकरणासाठी भरीव कार्य

महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महिला बचतगट स्थापन करून त्यांना स्वावलंबनाची संधी देण्याचे कार्य हाती घेण्यात आले. बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक मदतीसह विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले गेले. यामध्ये पेट्रोल पंप प्रशिक्षण, कंपोस्ट खत तयार करणे, हलव्याचे दागिने तयार करणे, हेअर ब्रांचिंग, फॅशन डिझाइनिंग आणि विविध प्रकारचे केक तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले.

आरोग्य व कल्याणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम

महिला आणि समाजाच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, त्यामध्ये कॅन्सर तपासणी, नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू ऑपरेशन, आणि रक्तदान शिबिरे यांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून अनेक गरजू लोकांना मोफत उपचार मिळाले.

बालकल्याण आणि खेळाला प्रोत्साहन

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. चित्रकला स्पर्धा, जिल्हास्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धा, डान्स स्पर्धा आणि बॉक्सिंग स्पर्धा यांचे आयोजन करून लहान मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्याचा प्रयत्न झाला.

समाजासाठी कार्यरत उपक्रम

सामाजिक कार्याच्या अंगाने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. कष्टकरी कामगार महिलांचा सन्मान, सफाई कामगारांचा सन्मान, भटक्या शाळांचा उपद्रव कमी करण्यासाठी प्रयत्न, चिंचवड गावातील स्मशानभूमीच्या विकासासाठी विशेष लक्ष, तसेच वाड भागात पेविंग ब्लॉक बसवणे यांसारखी कामे करण्यात आली. वाढदिवसानिमित्त मातृ सेवा अनाथ आश्रम व ममता बालाश्रमाला धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

समाजकारणाला प्राधान्य

राजकारणासोबतच समाजकारणालाही तितकेच महत्त्व देत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर महानगरपालिकेच्या चुकीच्या कारभारावर आवाज उठवला आणि यशस्वी आंदोलने केली. समाजहिताचे निर्णय घेण्यासाठी महिलांचे संघटन करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभावी कार्य करण्यात आले.

एक आदर्श कार्यपद्धती

महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि न्याय हक्कांसाठी संघर्ष या तिन्ही गोष्टी एकत्र आणत, महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी या कार्यपद्धतीने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या या उपक्रमांमुळे अनेक गरजू आणि कष्टकरी लोकांना आधार मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button