जागतिक महिला दिन विशेष – महिलांनो बोलते व्हा – डॉ. मृणाल वाघ (स्त्री रोग तज्ञ )


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –


“अन्नपूर्णा तू, गृहलक्ष्मी हि तू,
आणि तुच आहेस दुर्गा माता,
रोमारोमात तुझ्या भरलीये,
ममता आणि कणखरता…”

स्त्री ही केवळ घराचा कणा नाही, तर ती समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. तिच्या मेहनतीमुळे, जिद्दीमुळे आणि कणखरतेमुळेच एक सक्षम आणि समतोल समाज घडतो. महिला दिन हा केवळ उत्सव नसून, महिलांनी केलेल्या संघर्षाला, त्यागाला आणि त्यांच्या योगदानाला सन्मान देण्याचा दिवस आहे.
महिला सशक्तीकरणाची नवी दिशा
आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रांत पुढे आहेत. मग ते शिक्षण असो, उद्योग असो, राजकारण असो किंवा समाजसेवा – स्त्री शक्तीने नवा इतिहास घडवला आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीने आपले हक्क ओळखून, आत्मनिर्भर बनून आणि पुढाकार घेऊन आपली वाटचाल सुरू ठेवली पाहिजे.
जागतिक महिला दिन हा संपूर्ण जगभरातील महिलांच्या संघर्षांना, योगदानाला आणि यशाला सलाम करणारा दिवस आहे. दरवर्षी ८ मार्चला साजरा केला जाणारा हा दिवस महिलांच्या हक्कांची जाणीव करून देतो आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय योगदानाचा गौरव करतो.
महिला हा केवळ कुटुंबाचा आधार नसून संपूर्ण समाजाची आधारस्तंभ आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, विज्ञान, कला आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्यकौशल्याने ठसा उमटवला आहे. आजच्या आधुनिक युगात महिलांनी आपल्या कर्तृत्वाने अनेक अडथळे पार करत समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
परंतु अजूनही काही ठिकाणी महिलांना असमानता, भेदभाव आणि हिंसेला सामोरे जावे लागते. म्हणूनच, जागतिक महिला दिन केवळ आनंद साजरा करण्याचा नाही तर आत्मपरीक्षण आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. प्रत्येक महिलेला शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि संधी मिळावी, यासाठी समाजाने आणि प्रशासनाने अधिक संवेदनशील होणे गरजेचे आहे.
या वर्षीच्या महिला दिनाची थीम “Inspire Inclusion” आहे, जी महिलांच्या सर्वसमावेशक विकासावर भर देते. महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढावा, त्यांना समान संधी मिळाव्यात आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य प्रकारे सन्मान मिळावा, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.










