जागतिक महिला दिन विशेष – सक्षम महिलांसाठी कटिबद्ध नेतृत्व म्हणजे आशा शेंडगे


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिन हा केवळ उत्सव नाही, तर महिलांच्या सशक्तीकरणाचा, त्यांच्या संघर्षांचा आणि यशाचा गौरव साजरा करण्याचा दिवस आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरावर महिलांनी आपले योगदान दिले आहे आणि त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून देणारे सक्षम नेतृत्व अधिक महत्त्वाचे ठरते.


आशा धायगुडे शेंडगे, सलग दोन वेळा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. महिला नगरसेविका म्हणून काम करत असताना, माझ्यासमोर अनेक आव्हाने होती. मात्र, या सर्व गोष्टींकडे मी केवळ समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले आणि महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.महिला सुरक्षेसाठी ठाम भूमिकास्त्रीसुरक्षा ही केवळ चर्चा करण्याचा विषय नसून, त्यासाठी ठोस कृती करणे गरजेचे आहे. मुलींना स्वतःचा बचाव करण्यासाठी सक्षम करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रभागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी कराटे प्रशिक्षण सुरू करावे यासाठी मी महानगरपालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला आणि हा विषय मंजूर करून घेतला.

त्याचबरोबर, महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी वार्षिक लाठी-काठी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असावे, त्यांना स्वतःचा बचाव करता यावा आणि कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी त्यांची तयारी व्हावी, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.”गुड टच – बॅड टच” जनजागृती मोहिममुलींवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी सर्व शाळांमध्ये “गुड टच – बॅड टच” विषयावर जनजागृती मोहिम राबवली. मुलींना सुरक्षेची जाणीव व्हावी, योग्य-अयोग्य व्यवहार समजावे आणि ते निर्भयपणे व्यक्त करता यावे, यासाठी वैयक्तिक पातळीवर एनजीओच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.महिलांचे आर्थिक सबलीकरण : स्वयंपूर्णतेचा मार्गमहिला सक्षम झाल्या तर संपूर्ण कुटुंब सक्षम होते. त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘पवनाथडी’ उपक्रमाद्वारे प्रभागातील महिलांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हाती घेतले. अनेक महिला छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात, हे पाहून समाधान वाटते.महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी बचत गट स्थापन केले. या गटांसाठी बँकेकडून १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली. महिलांनी स्वतःच्या उद्योगासाठी कर्ज घेऊन आर्थिक स्वावलंबनाकडे पाऊल टाकले आहे, हे पाहून आनंद होतो.महिलांचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासमहिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. म्हणूनच, महिलांसाठी पोहण्याच्या मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था केली. यामुळे महिलांना एक नवीन कौशल्य मिळाले आणि आत्मविश्वासही वाढला.याशिवाय, नवोदित महिला उद्योजिकांसाठी ‘दिवाळी बाजार’ आयोजित करून त्यांचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.भविष्यातील दिशा : महिलांच्या पाठीशी सदैव उभी राहण्याचा निर्धारआजपर्यंत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले आणि भविष्यातही त्याच जिद्दीने कार्य करत राहीन. “ज्या महिलांना माझी कधीही मदत लागली, त्यांच्या अडचणींमध्ये, त्यांच्या उन्नतीमध्ये मी त्यांच्या पाठीशी उभी असेन.” हा माझा दृढ संकल्प आहे.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगदान द्यावे, त्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्न करावेत आणि सक्षम महिला हेच सक्षम समाजाची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवावे.










