चिखली कुदळवाडी भंगार दुकानाचे सेफ्टी ऑडिट करून निवासी क्षेत्रातील स्वतंत्र भंगार पार्क साठी अन्यत्र जागा मिळवून द्यावी – सचिन चिखले


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड आणि लगतच्या औद्योगिक अस्थापनातील स्क्रॅप चिखली कुदळवाडी परिसरातील हजारो दुकानांमध्ये साठवले जाते. भंगार विलगिकरण, पॅकिंग करणारे शेकडो कामगार असुरक्षित परिस्थितीत काम करत असतात. याठिकाणी गेल्या अनेक वर्षात मोठ्या आगी लागून आसपासच्या नागरी रहिवाशी परीसरात मोठ्या आगी लागल्या आहेत.



हा संपूर्ण परिसर बकाल, पर्यावरण आणि मानवी आरोग्यास धोकादायक आहे. केव्हाही मोठ्या प्रमाणात आगी लागू शकतात.

निवासी क्षेत्रात असलेल्या या दुकानांना स्वतंत्र भंगार पार्क साठी अन्यत्र जागा मिळवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखली यांनी केली आहे.
कुदळवाडी या ठिकाणी भंगार गोदामाला काल आग लागली होती, आज देखील त्या ठिकाणी अजून मोठ्या प्रमाणात आग चालूच आहे त्याच्या धुराने संपूर्ण परिसरात प्रदूषण खूप वाढलेले आहे, या पूर्वी देखील कुदळवाडी परिसरात खूप वेळा अश्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कालच्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही परंतु जवळ जवळ 60 ते 70 गोदामांना त्या ठिकाणी आग लागलेली आहे सुमारे दिड ते दोन एकर परिसरात हि आग पसरलेली आहे वारंवार अश्या घटना घडून देखील सर्रासपणे त्या ठिकाणी अशी गोदामे चालूच आहेत, तरी देखील प्रशासन त्या ठिकाणी संपूर्ण दुर्लक्ष करत आहे आता तरी प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष घालून काम केले पाहिजे या संदर्भात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा करून त्यावर योग्य ती रितसर कायवाही करण्यासाठी लवकरच भेट घेणार आहे.
त्याप्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, सचिव मनोज लांडगे, संघटक जयसिंग भाट, जय सकट, आझम शेख आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.








