सुसज्ज शहरात हॉकर झोन प्रक्रियेला गती देऊ – प्रदीप जांभळे पाटील


मानवाधिकार दिनी फेरीवाला संकल्प मेळावा उत्साहात साजरा



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड हे जलद गतीने वाढणारे शहर असून जागतिक दर्जाचे शहर म्हणून आपली ओळख निर्माण होत आहे पथ विक्रेता हा शहराचा एक भाग आहे व्यवसाय करत असताना नागरिक आणि प्रशासनाला अडचण होणार नाही याची काळजी घेऊन व्यवसाय करावा ,हॉकर्स झोन प्रक्रियेला दिरंगाई झालेली आहे मात्र इथून पुढे या सुसज्ज हॉकर झोन प्रक्रियेला गती देऊन न्याय देण्याची भूमिका प्रशासनाची राहील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले.

नॅशनल होकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने आज पिंपरी चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉल, धारकांचा मेळावा खंडोबा मंदिर सभागृह आकुर्डी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते.यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ए आर देशमुख, पिंपरी चिंचवड मनपा सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे,आरोग्य अधिकारी साबळे, निगडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, अग्निशमन कार्यालयाचे अधीक्षक जयंत मरळीकर, चिखली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे,शहर पथ विक्रेता समिती सदस्य किरण साडेकर, राजू बिराजदार,प्रल्हाद कांबळे, किसन भोसले, सलीम डांगे, अलका रोकडे यांचे सह सुनील कदम संगीता शेरखाने, अनिल बारवकर, सचिन कामठे, इरफान चौधरी, सलीम हवालदार, सुरज देशमाने ,रवींद्र गायकवाड,अंबादास जावळे, बालाजी लोखंडे, सुरेश देडे, लक्ष्मण शेरखाने,राजू पठाण,रुक्मिणी जाधव, रमेश बंडगर, महेंद्र सरवदे,मुमताज शेख, माधुरी जलमुलवार, लाला राठोड, नंदू अहिर, संभाजी वाघमरे, शंकर शिनगारे ,दत्ता जाधव, जरीता वाठोरे,महानंदा घाळगे, सुनिता पोतदार, रेवती इनामके, मिनक्षी टोंपे, सुनिता दिलपाक, प्रियांका काटे, विनोद इंगळे, प्रदीप लंघे ,प्रवीण लंघे, प्रदीप मुंडे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, दापोडी, भोसरी, वाल्हेकरवाडी, सांगवी, डांगे चौक ,बिजलीनगर, मोरवाडी ,सांगवी, रावेत, भोसरी, पिंपळे गुरव या परिसरातील विक्रेत्यानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा मिळावा यशस्वी केला.
पिंपरी चिंचवड शहर हे जागतिक दर्जाचे शहर म्हणून पुढे येत असून समन्वय साधून नागरिक, महापालिका प्रशासन आणि पथ विक्रेता सदस्य आणि संघटना यांच्यासोबत चांगले नियोजन करता येईल. त्याचबरोबर पीएम स्वनीधी आत्मनिर्भर योजनेत शहरातीलब खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेरीवाल्यानी सहभाग नोंदवलेला आहे. पुढील कालावधीमध्ये ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना देण्यात येतील . फेरीवाल्यानी दंडाची कारवाई टाळण्यासाठी ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण करून स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे मत जांभळे यांनी व्यक्त केले.
ए आर देशमुख यांनी शहरातील पथ विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद करून प्रशासनाच्या नियमाप्रमाणे स्नॅक्स सेंटर, चहा विक्रेते, ज्यूस सेंटर भेळ पाणीपुरी अशा प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यानी काळजीपूर्वक अन्न बनवण्यास प्राधान्य द्यावे . त्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात यावी आपण देत असलेल्या अन्नामुळे इतरांच्या आरोग्याला धोका होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
विठ्ठल साळुंखे यांनी पोलीस प्रशासन आणि शहरातील फेरीवाला घटकाचा नेहमीच संबंध येत असतो मात्र समाजामध्ये आपण वावरत असताना चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत किंवा आपण एखादी गोष्ट निदर्शनास न आणून दिल्याने मोठे नुकसान होनार नाही याची काळजी घ्यावी आपण नियमाप्रमाणे काम करत असल्यास आपल्याला त्रास झाल्यास पोलीस प्रशासन नक्कीच मदत करण्यास तयार आहे.
यावेळी शहरातील फेरीवाल्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत २० हजार व ५० हजार रुपयांचे प्रातिनिधिक स्वरूपातील चेक हे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी पूनम सुखदेव शिरगिरे, हर्षदा संताजी यांचा तर सुनीता लक्ष्मण बर्दापुरे , अथर्व सुरेश जाधव अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी स्मार्ट हातगाडी व स्मार्ट स्टॉलचे प्रदर्शन मांडण्यात आले याकडे सर्वांनी सर्वांचे लक्ष वेधले गेले .
नखाते म्हणाले की पिंपरी चिंचवड शहरातील पथारी,हातगाडी, टपरीधारकांना अधिकृतरित्या न्याय देण्याच्या दृष्टीने आपल्या पॅनलच्या सहा उमेदवाराला निवडून दिल्याबद्दल आपल्या शहरातील विक्रेत्यांचे आम्ही आभार मानतो, यापुढे शहरातील फेरीवाले अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतील हॉकर्स झोन, लायसन, परवाने व आपल्याला योग्य जागा मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू शहरातील सुमारे २५ हजार विक्रेत्यांचा हा प्रश्न आहे आणि शहरातील दिव्यांग बांधव, विधवा ताई यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न राहू . प्रल्हाद कांबळे यांनी गटई कामगारांना सोयी सुविधा पुरवन्यात याव्या आणि त्यांच्यावरील कारवाई थांबवावी अशी मागणी केली.
उपस्थित सर्व विक्रेत्यांनी विक्रेत्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी तर आभार परमेश्वर बिराजदार यांनी मानले.








