ताज्या घडामोडीपिंपरी

सुशिक्षित आणि योग्य नेतृत्व निवडण्याची वेळ बोपखेलवासीयांचा डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना आमदार करण्याचा निर्धार

Spread the love

 

बोपखेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुशिक्षित आणि योग्य नेतृत्व निवडण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे बोपखेलवासीय मतदारांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे ठरविले असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा युवती प्रमुख प्रतीक्षाताई घुले यांनी व्यक्त केली आहे.

आज डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी बोपखेल परिसरात आपली प्रचार फेरी आयोजित केली होती. यावेळी मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
या प्रचारफेरी दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. प्रतीक्षा ताई घुले म्हणाल्या की, डॉ. सुलक्षणा शिलवंत या विजयी झाल्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक या बोपखेल पासूनच सुरू होईल. त्याचबरोबर त्या आमदार झाल्यानंतर मतदार संघातील विकास कामांचा शुभारंभ देखील बोपखेल मधूनच होईल असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे अखंड बोपखेल परिसरातील मतदार सुलक्षणा शिलवंत धर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आहे.

रवींद्र कोवे यावेळी बोलताना म्हणाले की, ”ज्याची खरी सेवा! त्याच्या काय भय जीवा ” असे म्हणत, पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांनी आजवर केलेल्या कामाची पोचपावती दिली. सुलक्षणा शिलवंत यांनी समाजाची प्रामाणिक सेवा केली असल्याकारणाने त्यांना कोणतेही भय नाही त्या नक्कीच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन आमदार होतील. कोवे पुढे म्हणाले की, महायुती सरकारने लाडकी बहीण म्हणत त्याच बहिणीला अडचणीत आणण्याचे काम केले आहे. ऐन दिवाळीत तेलाचे भाव मोठ्या संख्येने वाढवले व नागरिकांना दिवाळी साजरे करणे अवघड करून सोडले होते.

भाग्यदेव घुले यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, जर योग्य नेतृत्व निवडून दिले तरच पिंपरी विधानसभा मतदार संघाचा विकास होणार आहे. सध्या असलेल्या आमदारांनी बोपखेल, रामनगर, गणेश नगर या भागातील विकासासाठी एक रुपयाचा ही निधी आणला नाही. त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली आहे. एक अत्यंत सुशिक्षित तसेच डॉक्टरेट प्राप्त केलेल्या महिला उमेदवार आपल्याला डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या रूपाने मिळाल्या आहेत. उच्चशिक्षित महिलेला विजयी करण्याची संधी पिंपरी विधानसभेतील मतदारांना मिळाली असल्याने बोपखेलवासीय मतदार निश्चितपणे डॉ. सुलक्षणा शीलवंत यांना विजयी करून दाखवतील.
डॉ. सुलक्षणा शिलवंत या प्रचार फेरीत परिसरात फिरत असताना घराघरात त्यांचे स्वागत करण्यात आले व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. हरिओम जेष्ठ नागरिक संघाने सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा व्यक्त करत विधानसभेत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button