Author: maharashtrabreakingnews.com

पिंपळे निलख , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपळे निलख व वाकड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शंतनू नांदगुडे, या उमेदवारांनी सविस्तर व लोकाभिमुख जाहीरनामा प्रसिद्ध केला. केवळ राजकीय पक्ष किंवा विचारसरणी बदलण्याऐवजी योग्य, सक्षम आणि जबाबदार उमेदवार निवडण्याचे महत्त्व अधोरेखित करत या जाहीरनाम्यात समाजहिताला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी मजबूत क्रीडा परिसंस्था व आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी समर्पित मार्ग, हक्कांची अंमलबजावणी आणि वाहतूक नियोजनात पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा स्पष्ट निर्धार नांदगुडे यांनी व्यक्त केला आहे. संघटित व्यापारासाठी स्वतंत्र फेरीवाला क्षेत्रे व नियोजित आठवडी बाजार उभारण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. शाश्वत विकासाच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मध्ये भव्य विजयी संकल्प जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कम, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख नेतृत्वाला पाठबळ देण्याचा निर्धार या सभेतून व्यक्त केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. सिध्दार्थ अण्णासाहेब बनसोडे, सौ. डॉ. वैशालीताई घोडेकर (लोंढे), सौ. सारीकाताई विशाल मासुळकर आणि श्री. राहुल हनुमंतराव भोसले यांच्या उपस्थितीत ही जाहीर सभा होत असून, विकास, पारदर्शक कारभार, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना आणि प्रभागाच्या भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर भूमिका मांडली जाणार आहे. ही सभा सोमवार, दिनांक १२ जानेवारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा ‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’ या घोषवाक्याखाली जाहीर केला. या घोषणेमध्ये शहराच्या मूलभूत प्रश्नांवर रोडमॅप मांडण्यात आला आहे. रोजच्या पाणीपुरवठ्यापासून ते रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पारदर्शक विकास आराखड्यापर्यंत, नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारे आश्वासन यामध्ये देण्यात आले आहे. सहा महिन्यांचे ऑन ग्राउंड सर्वेक्षण, प्रभागनिहाय संवाद आणि जनसंवाद उपक्रमातून तयार झालेला हा जाहीरनामा पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर आधारित आहे. सतत पाणीपुरवठा, गतिमान वाहतूक, स्वच्छ परिसर, सुलभ आरोग्यसेवा आणि थेट आर्थिक दिलासा या नागरिकांच्या मागण्या ठळकपणे या प्रक्रियेतून समोर आल्या. अजितदादांनी या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत निगडी प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुलभा उबाळे यांच्या प्रचाराने वेग घेतला असून “एकच नारा – आपला बाण धनुष्यबाण, आपलं मत धनुष्यबाण” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. प्रचार फेरीदरम्यान धनुष्यबाणाच्या चिन्हाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभागात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे. सुलभा उबाळे यांनी प्रभागातील विविध भागांत घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सेवा, महिला सुरक्षितता तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. “निगडी प्रभाग १३ मधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी उपलब्ध राहीन. विकास,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २६ मध्ये तुतारीचा आवाज दिवसेंदिवस अधिकच बुलंद होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सारिका गणेश कस्पटे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून, त्यांच्या जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. प्रचारादरम्यान सारिका कस्पटे यांनी प्रभागातील विविध भागांत घराघरांत जाऊन थेट संवाद साधला. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षितता, स्वच्छता आणि स्थानिक विकासकामे यासारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली. “प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हेच माझे पहिले प्राधान्य असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः महिलांमध्ये आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून साईमंदिर, वडमुखवाडी, चोवीसावाडी, चऱ्होली फाटा आणि आझाद नगर परिसरातील सर्व सोसायट्यांमध्ये माजी महापौर नितीनआप्पा काळजे, सचिनभाऊ तापकीर, सौ. अर्चना सस्ते आणि सौ. सारिका गायकवाड यांच्या प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्याला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रचारादरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील विकासकामांचा आढावा घेतला. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, शिक्षण, क्रीडांगणे तसेच महिलांसाठी सुरक्षिततेचे प्रश्न याबाबत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याची ठाम ग्वाही देण्यात आली. “विकास हा केवळ आश्वासनांपुरता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल परिसर तसेच अशोक थिएटर परिसरात प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय (आठवले) युतीच्या अधिकृत उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार उषा वाघेरे, मोनिका निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी यांच्या प्रचार फेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रचारादरम्यान स्थानिक व्यापारी, उद्योजक तसेच नागरिकांच्या भेटी घेत सविस्तर संवाद साधण्यात आला. या संवादातून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाबाबतच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्यसेवा आणि व्यापारविकास या मुद्द्यांवर उमेदवारांनी ठोस भूमिका मांडत प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शहरातील हजारो नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी मोठी राजकीय घडामोड घडली असून ब्लू लाईनचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर निर्णायक भूमिका घेतल्याने पुनर्विकासाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. या यशामागे सुरेश भोईर, मनीषा चिंचवडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अपर्णा डोके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची निर्णायक भूमिका ठरली आहे. ब्लू लाईनमुळे शहरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प, गृहसंकुले आणि व्यावसायिक इमारती वर्षानुवर्षे अडकून पडल्या होत्या. नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते, तर विकासावर गंभीर निर्बंध आले होते. या सर्व समस्यांकडे सुरेश भोईर, मनीषा चिंचवडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अपर्णा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २० मध्ये शिवसेनेच्या (धनुष्यबाण) उमेदवार राजेश वाबळे यांच्या पॅनलने प्रचारात आघाडी घेतली असून संत तुकाराम नगर, पिंपरी परिसरात त्यांचा जनसंपर्क दौरा विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या पॅनल मध्ये विनोद वाघमारे वैशाली राजेश वाबळे, स्वीटी मलतपुरे यांनी घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका यामुळे वाबळे पॅनलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी हे प्रमुख मुद्दे मांडण्यात येत असून “विकास, पारदर्शकता आणि जनहित” हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला आहे. संत तुकाराम नगरातील नागरिकांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी…

Read More

निगडीचा रणसंग्राम पेटला ,  शिवसेनेची पदयात्रा, अभिनेत्री पूजा काळेंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निगडी परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रभाग क्रमांक १३ क मध्ये शिवसेनेच्या रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर गट) पक्षाच्या वतीने सुलभा उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे, तानाजी शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत ही पदयात्रा पार पडणार असून, निगडी वसाहत, निगडी स्मशानभूमी परिसर, आजाद चौक, राहुल नगर, विलास नगर, राज नगर, संजय नगर, इंदिरा नगर व संगम नगर परिसरातून ही पदयात्रा मार्गस्थ होणार आहे. या पदयात्रेमध्ये शिवसेनेचे पक्षाचे…

Read More