राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये भव्य विजयी संकल्प जाहीर सभा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मध्ये भव्य विजयी संकल्प जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कम, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख नेतृत्वाला पाठबळ देण्याचा निर्धार या सभेतून व्यक्त केला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. सिध्दार्थ अण्णासाहेब बनसोडे, सौ. डॉ. वैशालीताई घोडेकर (लोंढे), सौ. सारीकाताई विशाल मासुळकर आणि श्री. राहुल हनुमंतराव भोसले यांच्या उपस्थितीत ही जाहीर सभा होत असून, विकास, पारदर्शक कारभार, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना आणि प्रभागाच्या भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर भूमिका मांडली जाणार आहे.
ही सभा सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कुलदीप आंगण शेजारी, शीतल हॉटेलसमोर, नेहरूनगर, पिंपरी येथे होणार आहे. या विजयी संकल्प सभेला प्रभागातील समस्त मतदार बंधू-भगिनी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिवर्तनाच्या या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.




















