पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल परिसर तसेच अशोक थिएटर परिसरात प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय (आठवले) युतीच्या अधिकृत उमेदवारांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार उषा वाघेरे, मोनिका निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी यांच्या प्रचार फेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
प्रचारादरम्यान स्थानिक व्यापारी, उद्योजक तसेच नागरिकांच्या भेटी घेत सविस्तर संवाद साधण्यात आला. या संवादातून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाबाबतच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्यसेवा आणि व्यापारविकास या मुद्द्यांवर उमेदवारांनी ठोस भूमिका मांडत प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा- आरपीआय (आठवले) युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांनीही विकासाच्या संकल्पाला साथ देत विश्वास व्यक्त केला असून, आगामी काळात प्रभागाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त होत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांना मिळणारा हा वाढता पाठिंबा विजयाचा मार्ग अधिक मजबूत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

















