Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 चा निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक 3 मध्ये “विश्वासाचे प्रतीक आणि विकासाची नवी दिशा” ठरलेल्या मा. माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपली हॅट्रिक पूर्ण केली आहे. चऱ्होली, मोशी आणि डुडुळगाव परिसरातील जनतेने त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास म्हणजे मागील दशकभरातील सातत्यपूर्ण विकासकामांची पोचपावती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून, प्रभागातील सर्वसमावेशक विकास, लोकाभिमुख धोरणे आणि प्रामाणिक कार्यपद्धतीचा विजय आहे. भोसरी विधानसभेचे आमदार मा. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीनआप्पा काळजे यांनी प्रभाग 3 मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधा यावर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली असून पत्रकारांनाही मतमोजणी कक्षात मज्जाव करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ च्या मतमोजणीवेळी आधीच नियोजनाचा गोंधळ असताना, माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारल्याने संताप व्यक्त केला जात आहे.लोकशाही प्रक्रियेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मतमोजणीसारख्या पारदर्शकतेची गरज असलेल्या टप्प्यावर पत्रकारांना दूर ठेवणे म्हणजे माहिती दडपण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया पत्रकार संघटनांकडून उमटत आहे. विशेष म्हणजे पोस्टल मतदानाची मोजणी सुरू असतानाही मीडिया कक्षातील डिस्प्ले बंद असल्याने पत्रकारांना अधिकृत आकडे व घडामोडी मिळू शकल्या नाहीत. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रतिनिधी, उमेदवारांचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होऊनही प्रभाग क्रमांक १६, १७, १८ आणि २२ च्या मतमोजणीदरम्यान प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे मतमोजणी प्रतिनिधींची गैरसोय झाली. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रतिनिधींना कोणतीही स्पष्ट सूचना न देता ताटकळत गेटच्या बाहेर उभे ठेवण्यात आले. एकीकडे पोस्टल मतदानाची मोजणी सुरू असतानाही दुसरीकडे मीडिया कक्षातील डिस्प्ले बंद असल्याने निकालाची अधिकृत माहिती वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे प्रतिनिधी, उमेदवारांचे समर्थक तसेच पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली.मतमोजणीसारख्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या प्रक्रियेत वेळेचे काटेकोर नियोजन, माहितीची पारदर्शकता आणि समन्वय अपेक्षित असतो. मात्र येथे…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून सुमारे सरासरी ५७.७१ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयअंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.५६ टक्के मतदान झाले. तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात वाढ होऊन ते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीकरिता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी गुरुवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी आज मी मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे. लोकशाहीने दिलेली ही ताकदच आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलू शकते. मतदान करणे हे केवळ आपले कर्तव्य नसून, येणाऱ्या पिढीसाठी सुदृढ आणि सक्षम शहर घडवण्याची जबाबदारी आहे.” तसेच “सर्व पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या लोकशाहीला बळकटी द्यावी,” असे आवाहन केले.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद नढे यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ठरलेल्या वेळेत ते मतदान केंद्रावर उपस्थित राहून शांततापूर्ण वातावरणात त्यांनी मतदान केले. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना विनोद नढे म्हणाले की, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हा केवळ हक्क नसून तो आपला लोकशाहीतील कर्तव्य आहे. प्रभाग २२ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर येऊन निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीची मतमोजणी आज, १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता महापालिका हद्दीतील निश्चित केलेल्या ८ ठिकाणी सुरू होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तीला ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १०, १४,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच प्रभाग क्रमांक १८ मध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप झाला आहे. भाजपच्या उमेदवार अपर्णा डोके यांचे पती निलेश डोके यांनी मतदान करतानाचा व्हिडिओ आणि फोटो थेट फेसबुकवर अपलोड केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. सर्वसामान्य मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही निलेश डोके यांनी मोबाईल मतदान केंद्रात नेला. यामुळे मतदान अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच बूथ प्रमुखांच्या कामगिरीवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. लोकशाहीचा कणा असलेली मतदान प्रक्रिया ही गुप्त आणि निर्भय असणे अपेक्षित असताना, भाजप उमेदवाराच्या पतीकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २८ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शत्रुघ्न काटे यांनी आज लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेत आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात त्यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान केले. मतदानानंतर त्यांनी बोटावरची शाई दाखवत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार व कर्तव्य आहे. प्रभाग २८ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून विकासाला पाठबळ द्यावे,” असे त्यांनी सांगितले. प्रभाग २८ मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाचे माजी प्राचार्य एस.एन. पाटील (वय ९४, रा. पिंपरीगाव) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रयत शिक्षण संस्थेच्या वाडा, पिंपरी, वडगावमावळ, शाहूवाडी या ठिकाणी यशस्वी मुख्याध्यापक म्हणून काम केले होते. या सर्व ठिकाणी सार्वजनिक लोक वर्गणीतून शाळेच्या इमारती बांधण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Read More