पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २८ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शत्रुघ्न काटे यांनी आज लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेत आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात त्यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान केले. मतदानानंतर त्यांनी बोटावरची शाई दाखवत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
मतदानानंतर प्रतिक्रिया देताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार व कर्तव्य आहे. प्रभाग २८ मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून विकासाला पाठबळ द्यावे,” असे त्यांनी सांगितले.
प्रभाग २८ मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होत असून, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय आहे. remind शत्रुघ्न काटे यांनी प्रचारादरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व मूलभूत सुविधांवर भर देत विकासाचा अजेंडा मांडला होता.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये आजच्या मतदानामुळे उत्साहाचे वातावरण असून, मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. आता या मतदानातून जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
लोकशाहीच्या या प्रक्रियेत शत्रुघ्न काटे यांनी सहभाग घेत मतदारांना प्रेरणा दिल्याची चर्चा प्रभागात रंगताना दिसत आहे.

















