Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपची सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता असल्याने महापौर भाजपचाच होणार, हे निश्चित असले तरी उमेदवारीसाठी पक्षांतर्गत मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे आणि सलग दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे हे महापौरपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत याआधी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि महिला खुला प्रवर्गातून महापौरांना संधी मिळाली आहे. प्रकाश रेवाळे, मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, योगेश बहल, मोहिनी लांडे, शकुंतला धराडे, नितीन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुटुंब, समाज, धर्म, संस्कृती, शिक्षण आणिअर्थकारण या समाज घटकांना सशक्त आणि निकोप करण्यासाठी समाज घटकाचा एक जबाबदार नागरिक म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने वापर करावा. आज नैतिक मूल्यांची मोठी पडझड होताना आपण प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत . गतकाळातील इतिहासाला साक्षी ठेवून संस्कार मूल्य आचरणात आणण्याची खरी गरज आहे. चंगळवाद आणि स्वैराचार यांना मूठमाती दिल्याशिवाय सुजाण आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रितम प्रकाश महाविद्यालय भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय कन्या अभियान’ या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्याच मार्गाने चालणे हेच खरे त्यांचे पूजन होय!’ असे प्रतिपादन राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कारप्राप्त वक्ते आणि विचारवंत सिद्धनाथ घायवट जोशी यांनी काळेवाडी, पिंपरी येथे व्यक्त केले. स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद विचारमंच द्वारा आयोजित विशेष कार्यक्रमात सिद्धनाथ घायवट जोशी बोलत होते. युवा उद्योजक राजेश अगरवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सिद्धनाथ घायवट जोशी पुढे म्हणाले की, ‘आपल्या देशात थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. प्रतिमापूजन, पुष्पहारअर्पण, मिरवणुका, जलसे, घोषणाबाजी यांमधून श्रद्धा व्यक्त केली जाते; मात्र या सर्व बाह्य साजरीकरणापेक्षा महापुरुषांचे विचार, मूल्यव्यवस्था आणि जीवनदृष्टी आपल्या आचरणात…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेचा समारोप शुक्रवारी (२३ जानेवारी) होणार आहे. शेवटच्या टप्यात शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ‘पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी, तसेच खासगी शाळा शुक्रवारी दुपारी बारापर्यंत सुरु ठेवाव्यात. त्यानंतर शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत’ असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. ‘या स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात शुक्रवारी ९९ किलोमीटर मार्गावर ही शर्यत होणार आहे. बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथून स्पर्धोचा प्रारंभ होणार आहे. तेथून पाषाणमार्गे एनसीएल चौक, रक्षक चौक, काळेवाडी फाटा, डांगे चौक, संत तुकाराम महाराज पूल, भक्ती शक्ती चौक, त्रिवेणीनगर, तापकीर चौक, काळेवाडी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी उतरलेल्या एकूण ६९२ उमेदवारांपैकी तब्बल ६१ टक्के, म्हणजे ४२३ उमेदवारांची अनामत (डिपॉझिट) जप्त झाली आहे. केवळ २६९ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश आले. निवडणुकीत अनेक पक्षांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. शहरात भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपने उभे केलेल्या १२३ पैकी एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) यांनीही प्रभावी कामगिरी करत १२० पैकी ११९ उमेदवारांचे डिपॉझिट वाचवले, तर केवळ एका उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. शिंदेसेनेने ५८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी १४ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले, तर ४३ उमेदवारांचे जप्त झाले. दुसरीकडे, उद्धवसेना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय), आशियाई सायकलिंग महासंघ (एसीसी) आणि आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ (यूसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा ‌‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर‌’ पिंपरी-चिंचवड शहरातून जात आहे. ‌‘टूर डी फ्रान्स‌’च्या धर्तीवर प्रथमच पुणे जिल्ह्यात ही स्पर्धा होत असून शुक्रवारी (दि. 23) स्पर्धेतील चौथा टप्पा होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. स्पर्धेचा मार्ग पिंपरी-चिंचवड व पुणे शहर हद्दीतून जाणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शुक्रवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. यातून पोलिसांची…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून २१ जानेवारी २०२६ पासून ही मोहिम शहरभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी विभागातील सर्व सहाय्यक मंडल अधिकाऱ्यांना थकबाकीदारांवर कोणतीही सूट न देता कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या बैठकीस शहरातील १८ विभागीय कार्यालयांतील सहाय्यक मंडल अधिकारी उपस्थित होते. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी विभागनिहाय स्वतंत्र पथके…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाश्वत घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी विविध राज्यांतील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मोशी येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पाला भेट दिली. या भेटीदरम्यान महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण साखळी, तांत्रिक प्रक्रिया व त्यातून होणारे पर्यावरणीय लाभ यांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. या अभ्यास भेटीदरम्यान महानगरपालिकेच्या वतीने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत केले. यावेळी उप अभियंता प्रदीप धेंडे यांच्यासह पंजाबमधील पंजाबी जागरणच्या तेजींदर कौर, पंजाब केसरी ग्रुपच्या वंदना, हिमाचल प्रदेशमधून हिमाचल दस्तकच्या आशा भारद्वाज, दैनिक भास्करच्या आंचल चौहान, चंदीगढमधून दैनिक ट्रीब्युनच्या कविता राज, हिंदुस्थान टाईम्सच्या अनिशा सरीन, द संडे गार्डियनच्या…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘गुरू गोविंदसिंह यांच्यामुळे सनातन हिंदुधर्म अस्तित्वात राहिला!’ असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सदस्य विशेष संपर्क विभाग विजयजीत सिंह वालिया यांनी विश्व हिंदू परिषद सभागृह, पुणे येथे मंगळवार,( दिनांक २० जानेवारी २०२६)  व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे वतीने शीख बंधू समागम आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून वालिया बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र धर्मप्रसार प्रमुख अजय निलदावार, लष्कर गुरुद्वारा प्रमुख चरणजीतसिंह सहानी, गुरुमुखसिंह गुरुनानी, हिंदू आध्यात्मिक सेवा संघ कोषाध्यक्ष गुरुबितसिंग मखिया, मनजितसिंह सेठी, नरेंद्र सिंह बक्षी, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांची व्यासपीठावर प्रमुख…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात शाळकरी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या राजकीय दादागिरीचा भाजपने जोरदार समाचार घेतला आहे. चार वर्षांपासून बंद असलेले आणि अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले काळेवाडी परिसरातील शालेय मैदान अखेर विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. काळेवाडी व पवनानगर परिसरातील महापालिकेच्या ताब्यातील मैदानावर काही ठरावीक व्यक्तींनी राजकीय आशीर्वादावर अतिक्रमण करून ते खासगी वापरासाठी बळकावले होते. परिणामी परिसरातील पाच प्राथमिक शाळांमधील तब्बल १८०० हून अधिक विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नव्हते. विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास धोक्यात आला असतानाही संबंधित प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजप नगरसेवक विनोद जयवंत नढे, नीता…

Read More