Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»विविध राज्यांतील पत्रकारांच्या शिष्टमंडळाची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पास भेट
ताज्या घडामोडी

विविध राज्यांतील पत्रकारांच्या शिष्टमंडळाची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पास भेट

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 January 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाश्वत घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी विविध राज्यांतील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मोशी येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती (Waste-to-Energy) प्रकल्पाला भेट दिली. या भेटीदरम्यान महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची संपूर्ण साखळी, तांत्रिक प्रक्रिया व त्यातून होणारे पर्यावरणीय लाभ यांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.
या अभ्यास भेटीदरम्यान महानगरपालिकेच्या वतीने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत केले. यावेळी उप अभियंता प्रदीप धेंडे यांच्यासह पंजाबमधील पंजाबी जागरणच्या तेजींदर कौर, पंजाब केसरी ग्रुपच्या वंदना, हिमाचल प्रदेशमधून हिमाचल दस्तकच्या आशा भारद्वाज, दैनिक भास्करच्या आंचल चौहान, चंदीगढमधून दैनिक ट्रीब्युनच्या कविता राज, हिंदुस्थान टाईम्सच्या अनिशा सरीन, द संडे गार्डियनच्या तरूनी गांधी, पीटीआय टीव्हीच्या नेहा शर्मा, अर्थ प्रकाशचे रंजू ऐरी, चंदीगढ पत्र सूचना कार्यालयाच्या संचालिक सपना, कार्यालय सहाय्यक सुनिता मोझा तसेच मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या विकेंद्रित कचरा व्यवस्थापन मॉडेलमुळे शहरातील सर्व ३२ प्रभागांमध्ये १०० टक्के ओला व सुका कचरा वेगळा करून दारोदारी संकलन करण्यात येत असून, ५०४ जीपीएस सुसज्ज वाहनांद्वारे एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्रातून रिअल टाइम देखरेख केली जाते. नागरिकांमध्ये कचरा विभाजनाची सवय निर्माण करण्यासाठी जनजागृती पथके कार्यरत असून, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाते.
पत्रकारांना उप अभियंता प्रदीप धेंडे यांनी माहिती देताना सांगितले की, शहरातून दररोज गोळा होणारा सुमारे १,४४० टन कचरा विविध प्रकल्पांद्वारे पुनर्वापर व ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येतो. मोशी येथील ७०० टन प्रतिदिन क्षमतेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात आतापर्यंत २ लाख टनांहून अधिक सुका कचरा प्रक्रिया करून १४.५५ कोटी युनिट्स वीज निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय ५०० टन प्रतिदिन क्षमतेचा कंपोस्ट प्रकल्प, ५० टन प्रतिदिन हॉटेल कचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प आणि १,००० टन प्रतिदिन क्षमतेची मटेरियल रिकव्हरी सुविधा कार्यरत आहे.
प्लास्टिक-टू-फ्युएल प्रकल्प, बांधकाम व राडारोडा पुनर्वापर युनिट्स, मॅग्नेटिक प्लाझ्मा तंत्रज्ञानाद्वारे धोकादायक कचऱ्याची प्रक्रिया, ई-कचरा केंद्रातून दुरुस्त केलेले लॅपटॉप महापालिका शाळांना देणे तसेच लेगेसी वेस्ट बायो-मायनिंगद्वारे १० लाख घन मीटरपेक्षा अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या भेटीदरम्यान मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दूरध्वनीद्वारे पत्रकारांशी संवाद साधून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची तांत्रिक बाजू, कार्यक्षमता, पर्यावरणीय परिणाम तसेच पत्रकारांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्नांचे सविस्तर निरसन केले.
या अभ्यास भेटीमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे शाश्वत कचरा व्यवस्थापन मॉडेल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे पत्रकारांनी नमूद केले.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगुरू गोविंदसिंह यांच्यामुळे सनातन धर्म अस्तित्वात राहिला! -विजयजीत सिंह वालिया
Next Article थकबाकीदारांनो सावधान! पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली जप्ती कारवाई
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.