Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या आणि सक्षम न्यायव्यवस्थेच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून, शहराला आता स्वतःचे हक्काचे “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय” लाभत आहे. या न्यायालयाचे भव्य लोकार्पण सोहळा रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी, सकाळी १०.३० वाजता, मोरवाडी येथील जुनी न्यायालयीन इमारत येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री.संदीप मारणे व श्री. आसिफ डॉक्टर यांच्या हस्ते तर पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश श्री. एम.के. महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. पिंपरी चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक व लोकसंख्येच्या शहरासाठी स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची आवश्यकता दीर्घकाळापासून जाणवत होती. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील निर्माणाधीन डबल डेकर पूल तसेच माण–हिंजवडी मेट्रो (लाईन–३) प्रकल्पाच्या कामाची पाहणी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी गुरुवारी केली. या पाहणीवेळी पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सैनी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणेकरांची वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल शक्य तितक्या लवकर सार्वजनिक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचे महानगर आयुक्तांनी यावेळी स्पष्ट…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  थोर स्वातंत्र्यसेनानी व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि. २३) अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास नियोजन विभागाच्या सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या तहसीलदार आशा होळकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्षता विभागातील पोलीस हवालदार संभाजी खरात व पोलीस हवालदार अमर…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – निगडी येथील अप्पू घर मनोरंजन केंद्र येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, स्वराज्याची स्थापना आणि त्यांच्या प्रमुख किल्ल्यावरील ऐतिहासिक माहीती सुमारे 30 मिनिटाची माहिती पट अप्पू घर येथील मिनी थिएटर मध्ये येत्या प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून मोफत दाखविण्यात येणार असल्याचे अप्पू घरचे मुख्य संचालक डॉ राजेश मेहता यांनी सांगितले . मात्र अप्पू घरचे प्रवेश शुल्क प्रत्येकाला द्यावे लागेल असे त्यांनी सांगितले. डॉ . मेहता पुढे म्हणाले, प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून तो आपल्या संविधान, इतिहास आणि स्वराज्याच्या मूल्याची आठवण करून देणारा दिवस आहे . मनोरंजनासोबत शिक्षण देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दहा जानेवारी जागतिक हिंदी दिनाच्या निमित्ताने पूर्वोत्तर हिंदी अकादमी (शिलाँग) मेघालय, केलनिय विश्वविद्यालय (कोलंबो) श्रीलंका, भारतीय उच्चायोग (कोलंबो) श्रीलंका यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय उच्चायोगाच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात दिनांक ९ ते १३ जानेवारी या कालावधीत भारत- श्रीलंका हिंदी संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले होते. भारताच्या अठरा राज्यातील आणि श्रीलंका येथील विविध शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, हिंदी सेवी, साहित्यकार निमंत्रित होते. भारत श्रीलंका या दोन देशांच्या पस्तीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या तसेच बत्तीस लेखकांनी आपले शोध निबंधाचे वाचन केले. जेष्ठ साहित्यिक प्रा. संजय पवार यांनी आपली अश्वत्थामा ही कविता या प्रसंगी सादर केली. या…

Read More

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था (MSIHMCT), पुणे येथील विद्यार्थ्यांनी PHDCCI नॅशनल यंग शेफ स्पर्धा २०२५–२६ च्या ग्रँड फिनालेमध्ये उपविजेतेपद पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग अँड न्यूट्रिशन (IHM), पुसा, नवी दिल्ली येथे पार पडली. देशभरातील नामांकित हॉटेल मॅनेजमेंट संस्थांच्या सहभागातून झालेल्या या स्पर्धेत MSIHMCT चे तृतीय वर्षाचे विद्यार्थी कु. आर्या कामत आणि श्री. महेश घुले यांनी अस्सल महाराष्ट्रीयन पाककलेचे नाविन्यपूर्ण सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली. त्यांच्या मेनूमध्ये वर्‍हाडी, कोकणी, खान्देशी तसेच महाराष्ट्रातील विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतींचे स्वाद पारंपरिकतेसोबत आधुनिक शैलीत प्रभावीपणे मांडण्यात आले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे विद्यार्थ्यांना कचऱ्याचा कमी वापर, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण या तत्त्वांवर आधारित महापालिकेच्या अभिनव आर.आर.आर. सेंटर संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली. कचरा निर्मिती कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, वापरलेल्या वस्तूंचा पुनर्वापर कसा करता येईल, तसेच पर्यावरण संरक्षणात प्रत्येक नागरिकाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीची राजकीय रणधुमाळी पुन्हा एकदा तापू लागली आहे. आरक्षण सोडतीत महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले होताच, आतापर्यंत संधीपासून दूर ठेवले गेलेले अनेक नगरसेवक सक्रिय झाले असून भाजपमधील अंतर्गत समीकरणांना नवी धार मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी महापौरपदासाठी थेट दावा ठोकत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. “मी महापौरपदासाठी इच्छुक आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडत त्यांनी निर्णयाचा चेंडू थेट पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टाकला आहे. भाजप संघटनेत दीर्घकाळ निष्ठेने काम केलेले शत्रुघ्न काटे हे पक्षातील अनुभवी आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. २०१२ आणि २०१७ मध्येही ते महापौरपदाच्या शर्यतीत होते. विशेषतः २०१७ मध्ये भाजप…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जय गणेश, जय गणेश… श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… चा जयघोष आणि वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे, मूषकाच्या पाठी बसून खेळे, जो बाळा जो जो रे जो… असे पाळण्याचे स्वर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. लाडक्या गणपती बाप्पाचा माघ शुध्द चतुर्थीला जन्म सोहळा साजरा होताना मंदिरात पाळण्यावर पुष्पवृष्टी करीत असताना गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. पारंपरिक वेशात सहभागी महिला आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीत सुवर्णपाळण्यात यंदाही गणेश जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा श्री गणेशाचा विनायक अवतार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्री गणेश जन्म सोहळा मंदिरात थाटात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा अंतिम आणि निर्णायक टप्पा उद्या, शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहरातून पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या (UCI) निकषांनुसार व्यापक व काटेकोर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रमुख टप्पा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथून दुपारी १.३० वाजता सुरू होणार असून पुणे शहरातील विविध मार्गांवरून जात हा टप्पा जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. या अंतिम टप्प्याचे एकूण अंतर ९९.१५ किलोमीटर आहे. ही स्पर्धा राजीव गांधी ब्रिज (औंध), काळेवाडी…

Read More