- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था (डिग्री), पुणे येथे आयोजन पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था (डिग्री), पुणे येथे “द ग्रेट इंडियन कार्निव्हल – भारतीय खाद्यपरंपरेचा गौरव” या भव्य खाद्य महोत्सवाचे नुकतेच आयोजन संस्थेच्या खुल्या प्रांगणात यशस्वीरित्या करण्यात आले. अंतिम वर्षाच्या बीएचएमसीटी (बॅच २०२२) विद्यार्थ्यांनी संपूर्णपणे संकल्पना मांडून साकारलेला हा महोत्सव अतिथींमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला. भारतीय गल्ल्यांतील चवी, सुगंध आणि संवादांनी परिसर उत्सवमय वातावरणात न्हाऊन गेला आणि सुमारे २०० हून अधिक पाहुण्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात मा. डॉ. विनोद मोहितकर सर (संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष, MSIHMCT) आणि डॉ. डी. व्ही. जाधव सर (सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, पुणे) यांची प्रमुख…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मीट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल १० सुवर्ण व २४ रौप्यपदकांसह पदकतालिकेत वर्चस्व राखत स्पर्धेचे विजेतेपद कायम ठेवले. एमआयटी-एडीटी विद्यापीठानंतर मुंबईतील बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाच्या संघाने एकूण ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा क्रमांक पटकाविला, तर पुण्यातील एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने ५ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. एमआयटी-एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही विजेतेपद पटकाविले होते. भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रचारासाठी क्रीडा भारती व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रमुख सहयोगाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. तब्बल १५ क्रीडा प्रकारांत, १५०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६,०००…
शिवसेने (उद्धव ठाकरे) कडून अजित पवारांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक, नागरी आणि पायाभूत विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, वाहतूक सुधारणा, औद्योगिक गुंतवणूक आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी घेतलेले निर्णय आजही विकासाच्या टप्प्यांवर दिसून येतात. त्यामुळेच शहराच्या प्रगतीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. अजित दादांसारखा विकासपुरुष पुन्हा होणे नाही, असं मतं शिवसेना (उद्धव ठाकरे) पिंपरी विधानसभा शिवसेना समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. प्रसिद्धीपत्रकात गुप्ता यांनी म्हटले की, ”राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाने…
बारामती, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८) सकाळी पावणेनऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. गुरूवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी जमलेल्या लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी अश्रू ढाळत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. मुंबईहून बारामतीकडेे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येत असताना बुधवारी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले. यानंतर संपूर्ण राज्यभर शोकाकुल वातावरण पसरले. अजित पवारांचा मृतदेह बारामती येथील पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. तेथे त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांत बदल करण्यात आला आहे. आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान, तर मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे. प्रचाराची मुदत ५ फेब्रुवारीच्या रात्री १० पर्यंत असेल. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग गुरुवारी घेणार असल्याचे बुधवारी दिले होते.
बारामती, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एकच वादा, अजित दादा,’ ‘अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे,’ ‘परत या, परत या, अजित दादा परत या…’ दादा, दादा… असा हंबरडा फोडत हजारोंच्या साश्रू नयनांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली. असा मनमिळाऊ, दिलखुलास, दिलदार नेता परत होणार नाही. अशा अवेळी अजित दादांसारखा उमदा नेता…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा सन्मान राखत, तसेच त्यांना श्रद्धांजली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद देऊन मोठेपण दाखवावे, अशी अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र (महाराष्ट्र शासन) तथा मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक : अध्यक्ष : अरुण पवार यांनी व्यक्त केली आहे. अरुण पवार म्हणाले, की सध्या राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून, स्व. अजित पवार हे महायुतीतील अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी नेते होते. राज्याच्या राजकारणासोबतच विकास प्रक्रियेत त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक, पायाभूत सुविधा,…
बारामती, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात होती अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणार नाही; पण, सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासमोर येणार नव्हतो; पण, काही माध्यमांमध्ये अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकातावरून मांडली गेली, असं कळलं. पण, यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार म्हणाले, या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया त्यात राजकारण आणू नये एवढंच सांगायचं…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खरा लोकनेता, कामगार-कष्टकरी, वाहतूकदार तसेच ऑटो-टॅक्सी चालकांचा आधारवड असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत अचानक निधन झाल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेने विशेषतः असंघटित क्षेत्रातील लाखो कष्टकऱ्यांसाठी हा दिवस अंधकारमय ठरला असल्याची भावना ऑटो-टॅक्सी कामगार संघटनेचे व असंघटित कष्टकरी जनतेचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केली. डॉ. कांबळे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, “अजितदादा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर गोरगरिबांचे, रस्त्यावर राबणाऱ्या ऑटो-टॅक्सी चालकांचे, कामगार-कष्टकऱ्यांचे खरे साथीदार होते. त्यांच्या मनात नेहमीच सर्वसामान्य माणसाची काळजी होती. उपमुख्यमंत्री पदावर असतानाही सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारा नेता आज आपल्यातून गेला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक असून महाराष्ट्राने एक धडाडीचे, लोकाभिमुख आणि करारी नेतृत्व गमावले आहे, अशी भावना आमदार महेश किसनराव लांडगे यांनी व्यक्त केली. आमदार लांडगे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, “अजितदादांसारखा प्रचंड कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. पहाटे सहा वाजेपासून जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या जाण्याने एक प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्व हरपले आहे.” राज्याच्या जडणघडणीत अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, असे सांगत आमदार लांडगे यांनी त्यांच्या कार्याचा…
