Author: maharashtrabreakingnews.com

– कामगारांनी सलग चौथ्यांदा दाखवला विश्वास – निकालानंतर भंडारा उधळून केला आनंदोत्सव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्राचा ‘कणा’ असलेल्या टाटा मोटर्स एम्प्लॉईजन युनियन सदस्यपदाच्या निवडणुकीत कामगार बंधू सचिन लांडगे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या निवडणुकीत विजयाचा ‘चौकार’ मारल्यामुळे त्यांच्यावर कामगार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या एम्प्लॉईज युनियनच्या कार्यकारिणीसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक होत असते. या निवडणुकीकडे कामगार क्षेत्राचे लक्ष असते. कंपनीच्या पॅसेंजर्स व्हेईकल बिझनेस युनिट व कर्मर्सिअल व्हेईकल बिझनेस युनिट असे एकूण ५ हजार ३७४ कामगारांनी मतदान केले. ट्रान्स एक्सल शॉप विभागात २२५ मतदार आहेत. त्यापैकी २१९ कामगारांनी मतदानाचा अधिकार…

Read More

– हळदी समारंभातून महिलांचा सन्मान ; घरकाम महिला सभेचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या युगातील महिला कितीही संकटे आली तरी स्वाभिमानी आणि स्वावलंबी बाण्याने जगत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाचा आधार बनत आहेत. त्यांचा हा लढा त्यांच्या जगण्याची प्रेरणा बनली असल्याचे प्रतिपादन घरकाम महिला सभेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा आशा कांबळे यांनी केले. घरकाम महिला सभेच्या वतीने पिंपरीतील कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले होते. या कार्यक्रमात सफाई कामगार महिला, घरेलु कामगार महिला, विधवा, परितक्त्या आदी महिलांचा सहभाग होता. यावेळी मार्गदर्शन करताना कांबळे बोलत होत्या. आर्थिक कमाई करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या महिलांचा या…

Read More

शहरातील मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज व शेकडो मंडळे करणार स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखों मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले आहेत.सर्व आंदोलक बुधवार दिनांक 24 रोजी मार्गे पदयात्रेने शहरात दाखल होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सांगवी फाटा येथे विविध संघटना व सार्वजनिक मंडळ जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करणार आहेत. यानंतर रक्षक सोसायटी चौक येथे पिंपळे निलख ग्रामस्थ तसेच जगताप डेअरी चौकामध्ये रहाटणी व पिंपळे सौदागरचे ग्रामस्थ काळेवाडी फाटा येथे काळेवाडी चे ग्रामस्थ व विविध मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. सोळा नंबर बस स्टॉप थेरगाव येथे मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संघ परिवार व वस्ती प्रमुख स्वामी समर्थ केंद्र महिलांच्या व गोंधळी समाज सेवा संघ तापकीर नगर जोतिबा नगर काळेवाडी तील सर्व राम भक्त स्वामी भक्त यांच्या उपस्थितीत श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला. विनोद तापकीर व ज्ञानेश्वर तापकीर यांच्या हस्ते  गणेश पूजन करून श्री रामाची आरती स्वामी ची आरती तुळजाभवानी मातेची आरती करून त्यांतर अन्न प्रसाद वाटप करून आनंदात उत्सवात फाटक्याची अतिषबाजी करीत स्वामी समर्थ केंद्र तापकीर नगर तुळजाभवानी मंदिर तापकीर येथे साजरा करण्यात आला असंख्य भक्तांच्या उपस्थित आनंदात साजरा करण्यात आला.

Read More

सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने गीत रामायण पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त देशभर उत्साह आणि आनंदी वातावरण आहे.अयोध्या मध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापना व्हावी ही कोट्यावधी भारतीयांची मनोकामना पूर्ण होत आहे. त्याच्या पूर्व संध्येला पिंपळे निलख मधील समस्थ ग्रामस्थ आणि सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम रामाच्या भक्तीची अनुभूती देणारा आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या दीर्घ तपस्येतून तयार झालेले आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरसाज चढवलेल्या या रचना स्वर्ग सुखाची ब्रम्हानंदी अनुभूती देणाऱ्या आहेत असे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी पिंपळे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून शनिवारी (दि.२०) मुंबईकडे रवाना झाली आहे. ती बुधवारी (दि.२४) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक हजारोंच्या संख्येने मदत करणार आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही. आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आरोग्याविषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा…

Read More

पिंपळे सौदागर मधील रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सकल हिंदू समाज आणि पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या द्वारे रविवार , दि.२१ जानेवारी रोजी भव्य राम शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते . यात्रेचा प्रारंभ कोकणे चौक येथून झाला. भव्य ९ फुटी राम मूर्ती त्यासोबतच १०१ ध्वज सनातन हिंदू धर्माची भव्यता दाखवत होती . पारंपरिक वेशभूषेत नटलेले स्त्री-पुरुष रामभक्त यांनी वातावरणात रामभक्तीची जणू लाट अवतरली होती . कोकणे चौक – शिवार चौक – कुणाल आयकॉन रोड – मार्गे उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय येथे यात्रेची समाप्ती झाली . भव्य राम यात्रेनंतर , महाआरती , रामरक्षापठण व…

Read More

शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळेत श्रीरामोत्सवानिमित्त शोभा यात्रा, किर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – मनुष्याला गर्व, अहंकार झाला की त्याची वर्तणूक बिघडते. याचा परिणाम त्याच्या संपूर्ण जीवनावर होतो. त्यामुळे गर्व आणि अहंकाराचा त्याग केला पाहिजे. सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागले पाहिजे. त्यातूनच आपला उत्कर्ष होऊ शकतो. वादातून काहीही निष्पन्न होत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालण्यापेक्षा समजूतीने वागले पाहिजे. यातच सर्वांचे हित आहे, असे मार्गदर्शन बाल कीर्तनकार ह.भ.प. नील महाराज करंजकर यांनी विद्यार्थ्यांना केले. अयोध्येत श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळीच्या यमुनानगर, निगडी येथील शाळेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अयोध्या राम नगरी येथे  प्रभू श्री राम  जन्मभुमी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता, याचे औचित्य साधत त्या निमित्ताने आज दि. २२ जानेवारी २०२४ रोजी  रहाटणी व पिंपळे सौदागर येथील रहाटणी मधील श्री राम मंदीर व पिपंळे सौदागर येथील महादेव मंदीर येथे नाना काटे सोशल फाऊंडेशन, उमेश काटे सोशल फाऊंडेशन, सागर कोकणे युवा मंच चा वतीने सामुहीक राम आरती, रामरक्षा पठण, भजन, किर्तन, महाप्रसाद वाटप आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. आज राम भजन कार्यक्रम झाल्यानंतर नाना काटे, शितल काटे उमेश काटे, सागर कोकणे यांच्या हस्ते प्रभु श्री राम याच्या मुर्तीची सामुदायिक आरती करण्यात आली,…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रामजन्मभूमी अयोध्येत होत असलेल्या प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे येथील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून ढोल-ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून निघालेल्या मिरवणुकीची आघाडी ‘गजकर्ण’ या विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशा पथकाने केली. तसेच यावेळी, टाळ-मृदुंगाच्या आवाजाने विद्यापीठाचे वातावरण भक्तीमय झालेले पाहायला मिळाले. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनिता कराड, प्र.कुलगुरु डॉ.अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह विद्यापीठाचा सर्व प्राध्यापक वर्ग या मिरवणुकीत सामील झाला होता. विद्यापीठाच्या स्कुल ऑफ आर्किटेक्चरकडून साकारण्यात आलेल्या राम मंदिराची प्रतिकृती या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होती.…

Read More