ताज्या घडामोडीपिंपरी

उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे सर्वात मोठ्या भव्य राम शोभा यात्रेचे आयोजन

Spread the love

पिंपळे सौदागर मधील रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सकल हिंदू समाज आणि पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या द्वारे रविवार , दि.२१ जानेवारी रोजी भव्य राम शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .

यात्रेचा प्रारंभ कोकणे चौक येथून झाला. भव्य ९ फुटी राम मूर्ती त्यासोबतच १०१ ध्वज सनातन हिंदू धर्माची भव्यता दाखवत होती . पारंपरिक वेशभूषेत नटलेले स्त्री-पुरुष रामभक्त यांनी वातावरणात रामभक्तीची जणू लाट अवतरली होती .

कोकणे चौक – शिवार चौक – कुणाल आयकॉन रोड – मार्गे उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय येथे यात्रेची समाप्ती झाली . भव्य राम यात्रेनंतर , महाआरती , रामरक्षापठण व तदनंतर महाप्रसादाचा रामभक्तांनी लाभ घेतला .

राम यात्रेमागील भूमिका विशद करताना , उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या , “ ५०० वर्षांची कलंकित गुलामगिरी नष्ट होऊन , श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीराम चंद्र विराजित होत आहे . ही देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना आहे . ही उत्सव भव्यदिव्य प्रमाणात साजरा व्हावा यासाठी ही भव्य राम यात्रा आयोजित करण्यामागील मानस आहे .”

आमदार अश्विनी जगताप , म्हणाल्या “ प्रभू श्रीरामांच्या दिव्य आगमनामुळे संपूर्ण भारत देशच राममय झाला आहे . अश्या प्रकारच्या औलोकिक घटना क्वचितच एकदा घडतात . त्यामुळे अश्या घटना तेवढ्याच उत्साहाने साजऱ्या करायला हव्यात . सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशने भव्य दिव्य रामयात्रेचे आयोजन करुन सर्व रामभक्तांना आनंदाची एकप्रकारे पर्वणीच प्रदान केली आहे . ”

पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष  शंकरभाऊ जगताप यांनी देखील रामशोभा यात्रेत उपस्थिती दर्शवली . उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे त्यांचा प्रभू श्रीरामाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला .

याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक श्री .संजय भिसे , पी.के.स्कूलचे संस्थापक जग्गनाथ आप्पा काटे , नगरसेविका निर्मला ,जयनाथ काटे ,भानुदास काटे – पाटील ,प्रकाश झिंझुर्डे , बाळासाहेब काटे , राजू भिसे , विजय भिसे , सोमनाथ काटे , मल्हारी कुटे , ह.भ.प. शेखर काटे , संदीप विठ्ठल काटे , कुटे , अण्णा शेलार , सुरेश कुंजीर , उन्नती सोशल फाऊंडेशनचे सदस्य , जेष्ठ नागरिक संघाचे तसेच , विठाई जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, आनंद हास्य क्लब चे सदस्य आणि पदाधिकारी आणि पिंपळे सौदागर , रहाटणी परिसरातील रहिवासी सोसायट्यांमधील चेअरमन , कमिटी मेंबर आणि रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button