चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रमावळ

मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची शहरात तयारी पूर्ण

Spread the love

 

शहरातील मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज व शेकडो मंडळे करणार स्वागत

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखों मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले आहेत.सर्व आंदोलक बुधवार दिनांक 24 रोजी मार्गे पदयात्रेने शहरात दाखल होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सांगवी फाटा येथे विविध संघटना व सार्वजनिक मंडळ जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करणार आहेत.

यानंतर रक्षक सोसायटी चौक येथे पिंपळे निलख ग्रामस्थ तसेच जगताप डेअरी चौकामध्ये रहाटणी व पिंपळे सौदागरचे ग्रामस्थ काळेवाडी फाटा येथे काळेवाडी चे ग्रामस्थ व विविध मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.
सोळा नंबर बस स्टॉप थेरगाव येथे मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व संतोष मंगल कार्यालयाचे सचिन बारणे व विविध मित्र मंडळ मोठ्या उत्साहात स्वागत करून अन्नदान तसेच पाणी वाटप करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या डांगे चौक थेरगाव येथील पुतळयास पुष्पहार अर्पण करून जरांगे पाटील अभिवादन करणार आहेत. काळेवाडी फाटा ते बिर्ला हॉस्पिटल रोडवर शेकडो मंडळी व सामाजिक संघटना थेरगाव ग्रामस्थ वाकड ग्रामस्थ ताथवडे ग्रामस्थ यांच्या वतीने स्वागत करणार आहेत.

याप्रसंगी सर्वच मंडळे अन्नदान वाटप फळे वाटप पाणी चहा वाटप करणार आहेत चिंचवडे लॉन्स वाल्हेकरवाडी कॉर्नर चिंचवड येथे चिंचवड ग्रामस्थ सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा व विविध मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे चिंचवडगाव येथील चाफेकर पुतळा चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास जरांगे पाटील अभिवादन करणार आहेत.

आकृर्डी ग्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटील यांचे ढोल ताशांच्या गजरात फुले उधळून स्वागत करण्यात येणार आहे याप्रसंगी खंडोबा मंदिरात जरांगे पाटील यांच्या हस्ते आरती होणार आहे.

भक्ती शक्ती समोर शिल्प छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांना जरांगे पाटील अभिवादन करून लोणावळा कडे मार्गस्थ होणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून मंगळवारी रात्री हजारो मराठा बांधव पदयात्रेत सामील होण्यासाठी आलेले आहेत त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने संतोष मंगल कार्यालय थेरगाव चिंचवडे लॉन्स चिंचवड आणि खंडोबा मंदिर ट्रस्ट मंगल कार्यालय येथे करण्यात आली आहे.
यासाठी संतोष मंगल कार्यालयाचे सचिन बारणे चिंचवडे लॉन्सचे दौलत खंडूशेठ चिंचवडे.आणि आकृर्डी ग्रामस्थ यांनी बहुमूल्य सहकार्य केले आहे.
आरोग्य सुविधा-खाजगी हॉस्पिटल्स व महानगरपालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने ऍम्ब्युलन्स तसेच मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

संतोष मंगल कार्यालय थेरगाव येथे मातोश्री हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर सुशील थोरवे डॉ.गणेश जाधव डॉ.मीनाक्षी वर्मा डॉ. बाळासाहेब सोनवणे आणि सहकारी मोर्चेकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार करणार आहेत.
तसेच चिंचवडे लॉन्स येथे डॉक्टर मोहन पवार संचलित त्रिवेणी हॉस्पिटल व वर्ल्ड मराठा आँर्गनायजेशनच्या डॉक्टर प्रतीक भोईर यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

आकुर्डी येथे डॉ.प्रसाद देशमुख व सहकाऱ्यांच्या वतीने मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा टँकर सुविधा व स्वच्छतागृहाची व्यवस्था पदयात्रा मार्गावर मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज व विविध मंडळाचे हजारो कार्यकर्ते मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम करत आहेत.

शहरातील पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन उत्तम सहकार्य करत आहेत. शहरातील विविध राजकीय पक्ष सुद्धा जरांगे पाटील यांचे अनेक ठिकाणी स्वागत करणार आहेत पदयात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सकल मराठा समाज तसेच मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे,वैभव जाधव,नकुल भोईर, प्रकाश जाधव,सचिन बारणे, मारुती भापकर,सचिन चिखले, मीरा कदम,सागर तापकीर,नवीन भालेकर,सचिन काळभोर,सागर चिंचवडे,दौलत चिंचवडे,मनोज आण्णा मोरे,अरुण पवार, शिवाजी पाडाळे,गणेश देवराम यांच्या सहकार्याने अनेक कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था पक्ष सार्वजनिक मंडळ यांच्या सहकार्याने नियोजन करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button