- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने गीत रामायण पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त देशभर उत्साह आणि आनंदी वातावरण आहे.अयोध्या मध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापना व्हावी ही कोट्यावधी भारतीयांची मनोकामना पूर्ण होत आहे. त्याच्या पूर्व संध्येला पिंपळे निलख मधील समस्थ ग्रामस्थ आणि सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम रामाच्या भक्तीची अनुभूती देणारा आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या दीर्घ तपस्येतून तयार झालेले आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी स्वरसाज चढवलेल्या या रचना स्वर्ग सुखाची ब्रम्हानंदी अनुभूती देणाऱ्या आहेत असे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी पिंपळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून शनिवारी (दि.२०) मुंबईकडे रवाना झाली आहे. ती बुधवारी (दि.२४) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक हजारोंच्या संख्येने मदत करणार आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही. आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आरोग्याविषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा…
पिंपळे सौदागर मधील रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सकल हिंदू समाज आणि पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या द्वारे रविवार , दि.२१ जानेवारी रोजी भव्य राम शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते . यात्रेचा प्रारंभ कोकणे चौक येथून झाला. भव्य ९ फुटी राम मूर्ती त्यासोबतच १०१ ध्वज सनातन हिंदू धर्माची भव्यता दाखवत होती . पारंपरिक वेशभूषेत नटलेले स्त्री-पुरुष रामभक्त यांनी वातावरणात रामभक्तीची जणू लाट अवतरली होती . कोकणे चौक – शिवार चौक – कुणाल आयकॉन रोड – मार्गे उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय येथे यात्रेची समाप्ती झाली . भव्य राम यात्रेनंतर , महाआरती , रामरक्षापठण व…
शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळेत श्रीरामोत्सवानिमित्त शोभा यात्रा, किर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मनुष्याला गर्व, अहंकार झाला की त्याची वर्तणूक बिघडते. याचा परिणाम त्याच्या संपूर्ण जीवनावर होतो. त्यामुळे गर्व आणि अहंकाराचा त्याग केला पाहिजे. सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागले पाहिजे. त्यातूनच आपला उत्कर्ष होऊ शकतो. वादातून काहीही निष्पन्न होत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालण्यापेक्षा समजूतीने वागले पाहिजे. यातच सर्वांचे हित आहे, असे मार्गदर्शन बाल कीर्तनकार ह.भ.प. नील महाराज करंजकर यांनी विद्यार्थ्यांना केले. अयोध्येत श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळीच्या यमुनानगर, निगडी येथील शाळेत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या राम नगरी येथे प्रभू श्री राम जन्मभुमी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता, याचे औचित्य साधत त्या निमित्ताने आज दि. २२ जानेवारी २०२४ रोजी रहाटणी व पिंपळे सौदागर येथील रहाटणी मधील श्री राम मंदीर व पिपंळे सौदागर येथील महादेव मंदीर येथे नाना काटे सोशल फाऊंडेशन, उमेश काटे सोशल फाऊंडेशन, सागर कोकणे युवा मंच चा वतीने सामुहीक राम आरती, रामरक्षा पठण, भजन, किर्तन, महाप्रसाद वाटप आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. आज राम भजन कार्यक्रम झाल्यानंतर नाना काटे, शितल काटे उमेश काटे, सागर कोकणे यांच्या हस्ते प्रभु श्री राम याच्या मुर्तीची सामुदायिक आरती करण्यात आली,…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रामजन्मभूमी अयोध्येत होत असलेल्या प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे येथील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून ढोल-ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून निघालेल्या मिरवणुकीची आघाडी ‘गजकर्ण’ या विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशा पथकाने केली. तसेच यावेळी, टाळ-मृदुंगाच्या आवाजाने विद्यापीठाचे वातावरण भक्तीमय झालेले पाहायला मिळाले. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनिता कराड, प्र.कुलगुरु डॉ.अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह विद्यापीठाचा सर्व प्राध्यापक वर्ग या मिरवणुकीत सामील झाला होता. विद्यापीठाच्या स्कुल ऑफ आर्किटेक्चरकडून साकारण्यात आलेल्या राम मंदिराची प्रतिकृती या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होती.…
अयोध्या, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाली. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्रीराम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यानंतर नरेंद्र मोदींनी उपस्थित साधू संत आणि निमंत्रित मान्यवरांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. राम वाद नाही, उपाय आहे यावेळी पीएम मोदी म्हणाले , राम मंदिराने प्रत्येकासाठी उज्ज्वल भविष्याची प्रेरणा दिलीय. राम वाद नाही, राम उपाय आहे, राम वर्तमान नाही, राम शाश्वत आहेत. राम सर्वव्यापी आहेत. आज अयोध्येत केवळ श्रीरामाच्या मूर्तीचेच अभिषेक झाला नाही, तर श्रीरामाच्या रुपातील भारतीय संस्कृतीवरील अतूट श्रद्धेचाही अभिषेक…
– हिंदूत्त्ववादी आमदार महेश लांडगे यांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ सोहळा – भगव्या पताका, वांद्यांचा निनाद अन् प्रचंड उत्साहात मिरवणूक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अत्यंत भक्तीमय… भगवामय… आणि मंगलमय वातावरण… फुलांचा वर्षाव अन् ढोल-ताशांच्या निनादामध्ये चौका-चौका होणारे स्वागत… फटाक्यांचे तुफान आतिषबाजी आणि ‘जय सियाराम’ चा गगणभेदी नारा… अशा उत्साहाच्या आणि भक्ती-भावाच्या वातावरणात तब्बल ५ लाख हून अधिक पिंपरी-चिंचवडकर रामभक्तांनी सहभागी होत महाराष्ट्रातील सर्वात मोठी रथयात्रा यशस्वी केली. राम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी भव्य ‘रथयात्रा’ आयोजित केली होती. त्याला रामभक्त, हिंदू बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला. देशाचे पंतप्रधान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग) – ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ हे आमचे हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम असले पाहिजे. जातपात धर्म न बघता समाजकारण समाजसेवा हे आमचे हिंदुत्व आहे. औरंगाबादच नाव आपण छत्रपती संभाजीनगर केलं पण दंगली होऊ दिल्या नाहीत कारण आपण सर्वांना सोबत घेतलं आणि तो निर्णय घेतला ह्यालाच आपण हिंदुत्व आपण बोलत असतो, असे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. “हृदयात राम आणि हाताला काम” हे आपलं हिंदुत्व असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाची महान्याय सभा पिंपरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य संघटक एकनाथ पवार, मावळ लाेकसभा मतदार संघाचे…
खेड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी'” हे ब्रीदवाक्य घेऊन जीवनाच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान असलेली राष्ट्रीय सेवा योजना हाच खरं समाजसेवेसाठी विद्यार्थ्यांना घडविण्याच्या उपक्रम आहे, “” असे उद्गार भगवान महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर कोहिनकरवाडी तालुका. खेड येथे आयोजित करण्यात आले असून सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माझ्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचा मोठा वाटा आहे. मी स्वयंसेवक म्हणून काम करीत असताना मला वेगवेगळे अनुभव घेता आले. जीवन जगण्याचे खरे कौशल्य मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शिकलो.…
