“राष्ट्रीय सेवा योजना जीवन समाजसेवेसाठी घडविण्याचा उत्तम उपक्रम” डॉ.अशोककुमार पगारिया
खेड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी'” हे ब्रीदवाक्य घेऊन जीवनाच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान असलेली राष्ट्रीय सेवा योजना हाच खरं समाजसेवेसाठी विद्यार्थ्यांना घडविण्याच्या उपक्रम आहे, “” असे उद्गार भगवान महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.
भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर कोहिनकरवाडी तालुका. खेड येथे आयोजित करण्यात आले असून सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माझ्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचा मोठा वाटा आहे. मी स्वयंसेवक म्हणून काम करीत असताना मला वेगवेगळे अनुभव घेता आले. जीवन जगण्याचे खरे कौशल्य मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शिकलो. आजही राष्ट्रीय सेवा योजनेच्या जीवनमूल्यांची शिदोरी मला वेगवेगळ्या प्रसंगी उपयोगी पडते. असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कोहिनकरवाडी गावचे सरपंच पंढरीनाथ कोहिनकर, माजी सरपंच वैशालीताई कोहिनकर, अविनाश कोहिनकर, भाग्यश्री कोहिनकर, संदीप कोहिनकर, संतोष उबाळे, मयूर कोहिनकर, नवनाथ कोहिनकर, निसर्ग मित्र गजानन बाभुळकर, मुळे सर प्राध्यापक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती हा या शिबिराचा मुख्य विषय आहे.
या शिबिराचे उद्घाटक अविनाश कोहिनकर यांनी श्रमदानासोबतच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करून ग्राम सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मा. श्री पंढरीनाथ कोहिनकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.गेली दोन वर्षाचा ऋणानुबंध यापुढे कायम राहील असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधाकर बैसाणे यांनी केले सात दिवसाच्या कलावधी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत त्या संदर्भातला आराखडा प्रास्ताविकेत मांडला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना सहसमन्वयक प्रा. महालक्ष्मी शिरसाट, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. सचिन पवार, परीक्षा अधिकारी डॉ. विजय निकम, बहि:शाल विभाग प्रमुख डॉ. स्वाती वाघ, ग्रंथपाल राजेश कुंभार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. हनुमंत शिंदे यांनी केले. प्रा. प्रवीण म्हस्के यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.